मुंबई

वरिष्ठ महाविद्यालये लवकरच खुली होणार

CD
वरिष्ठ महाविद्यालये लवकरच खुली होणार उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर मुंबई, ता. २१ : राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला संमती मिळताच राज्यातील सर्व विद्यापीठे, वरिष्ठ महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३ जानेवारीपासून सर्व विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले होते. तसेच सर्व परीक्षाही ऑनलाईन सुरू ठेवण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, राज्यातील अनेक भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने पुन्हा विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भावाचा आढावा घेऊन त्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर पुढील दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ महाविद्यालये लवकरच सुरू होणार आहेत. सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली. तसेच राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत, त्या परीक्षा १५ जानेवारीपर्यंत तशाच सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यात तूर्तास कोणताही बदल केला जाणार नाही, मात्र त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. चौकट ------ वसतिगृह लवकरच सुरू राज्यातील सामाजिक न्याय आणि उच्च शिक्षण, विद्यापीठे यांच्या अंतर्गत असलेली सर्व वसतिगृहे लवकरच सुरू होणार आहेत. यासाठीचे संकेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT