मुंबई

राज्य सरकार प्रमाणे केंद्राने कायदा करावा - जितेंद्र आव्हाड

CD
राज्य सरकारप्रमाणे केंद्राने कायदा करावा ः जितेंद्र आव्हाड कल्याण, ता. २२ (बातमीदार) ः केंद्र सरकार एवढे निर्दयी कसे होऊ शकते? राज्य सरकारच्या जमिनीवरील झोपड्यांना संरक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारने आम्हाला प्रस्ताव दिला तर आम्ही योजना आणू आणि या झोपडीधारकांचे पुनर्वसन करू, असे मत राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याणमध्ये व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेने रेल्वे रुळांलगतच्या झोपड्या सात दिवसांत रिकाम्या करण्याच्या नोटिसा रेल्वेने बजावल्याने नागरिक भयभीत झाले असून शनिवारी (ता. २२) कल्याण पूर्वमधील आनंदवाडीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. यावेळी आनंद परांजपे, जगन्नाथ शिंदे, सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी आव्हाड म्हणाले की, हे केंद्र सरकार एवढे निर्दयी कसे होऊ शकते? राज्य सरकारच्या जमिनीवरील झोपड्यांना संरक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारने आम्हाला प्रस्ताव दिला तर आम्ही योजना आणू आणि या झोपडीधारकांचे पुनर्वसन करू, असे आव्हाड यांनी म्हणत पुढे म्हणाले की, या कारवाईत सुमारे पाच लाख लोक बाधित होणार आहेत. एवढ्या लोकांना घराबाहेर काढण्यासाठी मिलिट्रीला बोलवावे लागेल. हे सर्व गोरगरीब लोकांना घाबरविण्यासाठीच करण्यात आले आहे. आधी घाबरवून सोडायचे आणि नंतर घर वाचविण्याचे प्रलोभन दाखवायचे हे तंत्र केंद्रातल्या सरकारचे आहे. येथे राहणारे लोक हे पोटापाण्यासाठी गाव सोडून आले आहेत. गावात गावकुसाबाहेर राहावे लागले होते. इथे थोडेसे सन्मानाने जगण्याची संधी आली असतानाच ही नोटीस आली आहे; पण नोटीस पाठवणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावे की, रेल्वेचे विस्तारीकरण नसतानाही जर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तीन तास रेल्वे रोखली तर सबंध देशातील रेल्वे वाहतूक ठप्प होईल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी रेल्वे प्रशासनाला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT