Dr Yogesh Lakhani Sakal
मुंबई

बॉलीवूडच्या पार्ट्यांकडून समाजसेवेकडे; डॉ. योगेश लखानी यांचा विलक्षण जीवनप्रवास

जाहिरातीच्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर असणारे डॉ. योगेश लखानी मोठ्या पार्ट्या आयोजित करताना आणि बॉलीवूडच्या सुपरस्टारसोबत, राजकीय नेते, मंत्री अशा बड्या असामींसोबत वावरताना दिसतात.

सकाळ वृत्तसेवा

जाहिरातीच्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर असणारे डॉ. योगेश लखानी मोठ्या पार्ट्या आयोजित करताना आणि बॉलीवूडच्या सुपरस्टारसोबत, राजकीय नेते, मंत्री अशा बड्या असामींसोबत वावरताना दिसतात.

मुंबई - जाहिरातीच्या क्षेत्रात (Advertising Field) यशाच्या शिखरावर असणारे डॉ. योगेश लखानी (Dr Yogesh Lakhani) मोठ्या पार्ट्या आयोजित करताना आणि बॉलीवूडच्या (Bollywood) सुपरस्टारसोबत, राजकीय नेते, मंत्री अशा बड्या असामींसोबत वावरताना दिसतात. मात्र अलीकडच्या काही वर्षांत त्यांच्या पार्ट्या कमी करून गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू केले आहे.

गेली काही वर्षे सातत्याने सामजसेवा सुरू आहे. सध्या पत्नी जागृती आणि मुलगा अनुग्रह यांच्या वाढदिवसाच्या (ता.२४) निमित्ताने भिवंडीमधील आदिवासी गावात बाराशे ते पंधराशे लोकांना अन्नदान केले जाणार आहे. शिवाय अनाथालय वृद्धाश्रम आणि रुग्णालयांमध्ये मदत करणार आहेत. डॉ. योगेश लखानी म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रचंड मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर यश मिळविले मोठे व्यक्तिमत्त्व होय. दहा बाय दहाच्या छोट्याशा घरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज एका आलिशान ऑफिसपर्यंत पोहोचला आहे. ब्राईट मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून आज ते प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर आहेत. बॉलीवूडचे सुपरस्टार, देशातले मोठमोठे राजकीय नेते, मंत्री आणि समाजातील विविध क्षेत्रांत यश मिळवले लोक आवर्जून त्यांच्या पार्ट्यांना हजर राहत असतात. किंबहुना अनेक जण त्यांच्या अशा पार्ट्यांची निमंत्रणे कधी येतात याची वाट पाहत असतात. बॉलिवूडच्या या चकाचक दुनियेत रमणारा हा माणूस अलीकडे मात्र समाजसेवेसाठी मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा देताना दिसतो आहे. विविध प्रकारे सामाजिक कार्य करण्यात गुंतलेल्या लखानी यांच्या वतीने दर रविवारी रस्त्यावर जगणाऱ्या‍ हजारो गरीब लोकांना जेऊ घातले जाते.

यशाचे गमक डॉ. लखानी यांनी आतापर्यंत दहा हजार चित्रपटांसाठी काम केले आहे. पाच हजार वेळा त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ४२ वर्षे आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जाहिरातीचे अमाप काम केले आहे. असे असूनही हा माणूस अत्यंत विनम्र आहे. आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद, ईश्वराची कृपा आणि सातत्याने केलेली मेहनत हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे डॉक्टर ते सांगतात. डॉक्टर योगेश लखानी यांच्या आयुष्यावर लवकरच चित्रपटसुद्धा येतो आहे. एक पुस्तकही येणार आहे. ... गरिबीतून यशाकडे... लखानी सांगतात, ‘माझा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. मला रुग्णालयातून घरी नेण्यासाठी माझ्या आईजवळ पैसे नव्हते.

आम्ही दहा बाय दहाच्या या खोलीत राहत होतो. पाचवीत असताना मी रस्त्यावर वर्तमानपत्रे, फटाके, माचीस यांची विक्री केली. छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. पुढे १९८० साली व्यवसाय सुरू केला. पहिली पाच वर्षे तर रात्र-रात्रभर न झोपता काम केले. मात्र संधी मिळाली तेव्हा त्या संधीचे सोने केले. हिंदी चित्रपटसृष्टीत शिरकाव झाल्याने मला मोठी संधी मिळाली. मी त्याकाळी सुरू केलेली तीन लाख रुपयांत ५० होर्डिंगची स्कीम प्रचंड लोकप्रिय झाली. मग मला चित्रपटांची कामे मिळू लागली. शाहरुख खान, सलमान खान, ऋतिक रोशन, रणवीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोन, बिपाशा, कॅटरिना अशा कितीतरी सुपरस्टारची कामे मी केली आहेत.’

माणसाने एखाद्या झाडासारखे जगावे. झाड स्वतः उन्हात राहून इतरांना सावली देते. माझ्या अंगात ४० वर्षांपूर्वी जी ऊर्जा होती, त्याच ऊर्जेने मी आजही काम करतो. अनेक वाईट दिवस पाहिले, पण स्वप्न पाहणे सोडले नाही. आज ती स्वप्नही सत्यात उतरली आहेत.

- डॉ. योगेश लखानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT