मुंबई

गोवंडीत तरुणीवर चौघांचा अत्याचार, दोन अल्पवयीन ताब्यात

CD
गोवंडीत तरुणीवर चौघांचा अत्याचार दोन अल्पवयीन ताब्यात; इतर दोघांचा शोध सुरू मानखुर्द, ता. २३ (बातमीदार) : गोवंडीच्या शिवाजीनगर जुना बस आगार परिसरात शनिवारी (ता. २२) पहाटे तरुणीवर चौघांनी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीने स्वतः पोलिसांशी संपर्क साधून याविषयी माहिती देताच शिवाजी नगर पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. या गुन्ह्यात सहभाग असलेल्या दोघा अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. कॅटरिंगचे काम करून ही तरुणी शिवाजीनगर येथील घरी शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास परतत होती. जुना बस आगारातून १३ व्या रस्त्याकडे मट्टीचा रोड परिसरातून जात असताना तिच्या परिचयाचे चौघे जण भेटले. त्यातील एकाने तिची विचारपूस करून काही बोलायचे आहे, असे म्हणत सोबत येण्यास सांगितले. जवळच असलेल्या एका घराच्या पोटमाळ्यावर तिला नेले. इतर तिघेही त्यांच्यापाठोपाठ घरात आले. चौघांनी तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तरुणी आरडाओरडा करू लागली. त्यावेळी चौघांपैकी एकाने तिचे तोंड दाबून आवाज बंद केला व त्यानंतर चौघांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर चौघांनी तिथून पळ काढला. तरुणीने पोलिसांशी संपर्क साधून घटनेविषयी माहिती दिली. पोलिसांनी या ठिकाणी भेट देऊन तरुणीचा जबाब नोंदवून गुन्ह्याची नोंद केली. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पहाणी केली व आरोपींना पकडण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांना मार्गदर्शन केले. पोलिसांनी दहा पथके स्थापन करून मुंबई, नवी मुंबई, ठाणेसह इतर काही ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहिती तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघा अल्पवयीनांना डोंगरी येथून ताब्यात घेण्यात यश आले. ते दोघे उत्तर प्रदेशातील बस्ती येथे पळून जाण्याच्या तयारीत होते, तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

Pune News : सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की? भेकराईनगर गोशाळा येथील प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT