Tortoise sakal media
मुंबई

डोंबिवली : ५० भारतीय कासव मृत्युमुखी; तलावातील १४ जणांना वाचवण्यात यश

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : गौरीपाडा येथील तलावात ५५ कासव मृतावस्थेत (Tortoise death) वॉर संस्थेला आढळून आले आहेत. मात्र पाण्यातील माशांना कोणतीही हानी न झाल्याने फक्त कासवांचा मृत्यू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. १४ कासवांना वाचवण्यात संस्थेला यश आले. तलावातील कासवांच्या मृत्यूचा तपास वन विभागाकडून (Forest department) केला जात आहे. कल्याण पश्‍चिमेतील (Kalyan lake) गौरीपाडा येथील तलावातील पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी लोकप्रतिनिधी दया गायकवाड यांना दिली होती.

त्यांनी पाहणी केली असता अनेक कासव मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती वॉर संस्थेला देताच कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. तलावाच्या काठावर ५५ भारतीय मृदू कवचाचे कासव (इंडियन सॉफ्ट शेल टर्टल) मृत्युमुखी पडले असल्याचे दिसून आले. चार र्इयर्ड स्लायडर व नऊ मृदू पाठीचे कासव अशा एकूण १४ कासवांना वाचवण्यात त्यांना यश आले.

वनविभागाच्या परवानगीने त्यांच्यावर खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती प्राणिमित्र सुहास पवार यांनी दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला व दोन मृत कासव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत; तर २३ जणांवर अग्निसंस्कार करण्यात आले. कासवांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? तलावातील पाण्यात रसायन मिश्रित होते का? याचा तपास वनविभागाकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: ५ कोटींच्या सोन्याची तस्करी, भाजप नेत्यासह ७ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

Police Adhikshak Tushar Patil Death : अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन; वयाच्या ४५ व्या वर्षी प्राणज्योज मालवली

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

SCROLL FOR NEXT