road accident sakal media
मुंबई

पालघर : भादवे येथे अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पालघर : एडवणजवळील भादवे येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्या ट्रकला पाठीमागून मोटरसायकल आदळून झालेल्या अपघातात (Truck-bike accident) एडवण येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू (Two people died) झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली. गणेश वामन वैती (४५) आणि दिपेश जयवंत तरे (३५) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. गणेश आणि दिपेश हे दोघे सफाळेजवळील रामबाग येथील अमेटी लेदर इंटरनॅशनल कंपनीत काम करीत होते.

शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कंपनीतून काम आटोपून दोघेही नेहमीप्रमाणे आपल्या मोटरसायकलीवरून आपल्या घराकडे निघाले होते. हे दोघेही भादवेजवळ आले असताना संतोष पाटील यांच्या मालकीचा एक ट्रक बंद अवस्थेत रस्त्यावर उभा होता. यावेळी या ट्रकला साईड सिग्नल अथवा कुठलेही मार्गदर्शक चिन्ह न लावता चालक जावेद मोहमद शेख यांनी आपला ट्रक उभा केल्याने अंधारात उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने मोटरसायकलने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद केळवे सागरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

Zohran Mamdani : ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारतीय वंशाची व्यक्ती बनली महापौर, न्यूयॉर्कमध्ये बसला धक्का; कोण आहेत जोहरान ममदानी?

Mumbai Monorail: मोनोरेलचा ट्रायल रनदरम्यान अपघात! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर, विमानतळावर आगमण

Pune News : ‘माझा रोहन मला पुन्हा द्या...’ मृत्यू झालेल्या मुलाच्या आईचा टाहो; ४२ तासांनंतर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT