मुंबई

८२ टक्के आरोपींना शिक्षा

CD
८२ टक्के आरोपींना शिक्षा वसई भाईंदर पोलिस आयुक्तालयाची कामगिरी भारी वसई, ता. २४ (बातमीदार) : अनेकदा पुराव्याअभावी गुन्हा करूनदेखील आरोपी सुटतो आणि पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहते; मात्र वसई विरार मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाने वर्षभरात विविध गुन्ह्यांअंतर्गत ज्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या व न्यायालयात हजर केले त्यापैकी ८२ टक्के आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याची उकल करताना पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केल्याने पोलिसांना हे यश मिळाले आहे. वसई विरार मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर पोलिस ठाणे, चौक्या यात वाढ करतानाच स्थानिक गुन्हे शाखा, सायबर गुन्ह्यांसह अन्य गुन्ह्यांवर पोलिसांतर्फे करडी नजर ठेवली जात आहे. गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी पोलिस आयुक्तांकडून वेळोवेळी पोलिसांना सूचना दिल्या जात असून त्यांच्या कार्याचा आढावाही घेतला जात आहे. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना चांगले यश येत आहे. खुनासह जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, वाहनचोरी, खून, हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार, विनयभंग, अपहरण, खंडणी त्याचबरोबर ऑनलाईन फसवणूक, अमली पदार्थ वाहतूक, तस्करी यासह विविध गुन्हे हे मागील वर्षभरात वसई विरार व मिरा भाईंदर शहरात घडले. यातील अनेक आरोपी गुन्हा केल्यावर परराज्यात पळून गेले होते; मात्र पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळल्या व त्यांना शहरा आणले. काही आरोपींना सीसीटीव्हीच्या आधारे पकडण्यात आले. अनेक गुन्ह्यात पुरावे मिळवताना पोलिसांना कसरत करावी लागली; तरीही पोलिसांनी अनेक बाजू पडताळत हे तपास पूर्ण केले व सबळ पुरावे जमा केले. ३०४ प्रकरणांत तडजोड वसई विरार मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाने वर्षभरात न्यायालयात दाखल केलेल्या एक हजार ३४१ निकालांवर सुनावणी झाली. त्यात एकूण ६४९ जणांना शिक्षा, ३०४ प्रकरणांत आरोपी व तक्रारदारांमध्ये तडजोड व १८८ जणांची सुटका झाली. टक्केवारी पाहता ८२ टक्के गुन्हेगार शिक्षेस पात्र ठरले आहेत. -------------------------------- कोट मिरा भाईंदर व वसई विरार शहरात होणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी प्रत्येक परिमंडळातील अधिकारी, कर्मचारी, सायबर विभाग, गुन्हे शाखा काम करत आहे. वर्षभरात गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांमध्येदेखील जनजागृती केली जात आहे. - सदानंद दाते, पोलिस आयुक्त ​ ------------------------------------ शिक्षा व आरोपी संख्या जन्मठेप - २ ५ वर्षे कोठडी - ९ ३ वर्षे - १० २ वर्षे - ६ १० वर्षे - २ ४ वर्षे - ४ १ वर्ष किंवा दंड - ८२४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dirty act in Restaurant: ईईई.. जेवणातील खाद्यपदार्थांवर घासायचा गुप्तांग अन् करायचा लघवी! मोठ्या हॉटेलमधील वेटरचं किळसवाणं कृत्य

Rohit Sharma : KKRच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माची सीक्रेट मीटिंग? अफवांच्या बाजारात चर्चांना उधान

Entertainment News: "क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

IPL 2024 : विराट कोहली रचणार इतिहास! दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मैदानात एन्ट्री मारताच करणार 'हा' मोठा विक्रम

HRA Claim: वडिलांना मिळालेल्या सरकारी घरात राहणाऱ्या कर्मचाऱ्याला एचआरए मिळू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT