school starts
school starts sakal media
मुंबई

नवी मुंबईतील शाळा पुन्हा गजबजल्या; विद्यार्थ्‍यांची उत्‍स्‍फूर्त हजेरी

सकाळ वृत्तसेवा

वाशी : कोरोनासोबत ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या (omicron infection) पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने (Maharashtra Government) घेतला होता. आता रुग्णसंख्या कमी होत असल्‍याने सर्व शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना स्‍थानिक प्रशासनाला देण्यात आल्‍याने नवी मुंबई महापालिका (bmc) क्षेत्रातील शाळा सुरू झाल्‍या आहेत. सोमवारी विद्यार्थ्‍यांचे तापमान तपासूनच त्‍यांना शाळेत (school) प्रवेश दिला जात होता.

पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्‍यांनी उत्‍स्‍फूर्तपणे हजेरी लावली, मात्र खासगी शाळांमधील विद्यार्थ्‍यांची संख्या कमी होती. कोरोनामुळे दीड वर्षाहून अधिक काळापासून घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा सुरू असली तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची सर्वच जण वाट पाहत होते. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर १५ डिसेंबरपासून पहिली ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आणि ओमिक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता महापालिकेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

आता रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे शासनाने पुन्हा शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार पहिली ते आठवीचे वर्ग कोरोना नियम पाळून सुरू झाल्‍याने शाळा परिसर पुन्हा गजबजला आहे. शाळेच्या पहिल्‍याच दिवशी नवी मुंबई महापालिकेच्या शाळांना उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला, तर अनुदानित शाळांमध्ये पन्नास टक्के उपस्थिती होती. सीबीएसईच्या शाळांमध्ये काहीसा निरुत्‍साह दिसून आला. विद्यार्थ्यांच्या स्‍वागतासाठी फलकावर सुंदर सुविचार लिहिण्यात आले होते.

राज्य शासनाच्या सूचनेनुसार, नवी मुंबईत शाळा सुरू झाल्या आहेत. लहान मुले जर मॉल, उद्यानांमध्ये जाऊ शकतात तर त्यांनी शाळेतही जाणे आवश्यक आहे. आता कोरोनाबरोबर लढण्याची सवय लावून घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने काळजी घेऊन विद्यार्थ्यांना देखील शाळेत पाठवणे आवश्यक आहे. तसेच आता कोरोनाशी लढताना काय खबरदारी घ्यावी, याची माहिती सर्वांनाच आहे. - अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT