Strike
Strike Sakal media
मुंबई

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील परिचारिकांचे काम बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : रुग्णालयात आधीच कर्मचारीवर्ग कमी असताना नव्याने आयसोलेशन विभाग (Isolation department) सुरू करण्याच्या रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेविरोधात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील परिचारिकांनी (Nurses strike) सोमवारी ‘काम बंद’ आंदोलन केले. या वेळी नवीन स्टाफ (New staff demand) घेण्याची मागणीदेखील त्यांनी केली. आंदोलन करणाऱ्या परिचारिकांनी सांगितले की, १९९२ पासून आम्ही येथे काम करीत आहोत. मागील दोन वर्षांपासून कामाचा ताण अधिक वाढला आहे.

अनेक परिचारिका सेवानिवृत्त झालेल्या आहेत. अनेकांनी कामाचा ताण सहन होत नसल्याने काम सोडले आहे; तर काही सेवानिवृत्तीच्या मार्गावर असलेल्या परिचारिकांना आजही डबल ड्युटी करावी लागत आहे. कोरोनात ७० परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. त्यानंतर आतादेखील अनेक परिचारिकांना कोरोनाची बाधा होत आहे; परंतु पाच दिवसांची सुट्टी देऊन पुन्हा कामावर हजर राहण्यास सांगितले जात आहे. रुग्णांची काळजी आम्ही घेतो, आमची काळजी घेणारे येथे कोणीच नाही.

आधीच परिचारिकांची संख्या कमी आहे. त्यात आता येथे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपुऱ्या कर्मचारीसंख्येमुळे हे कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. प्रशासनाने आधी रुग्णालयातील परिचारिकांची आणि कर्मचाऱ्यांची भरती करावी, मगच हा वॉर्ड सुरू करावा, अशी मागणी आंदोलक परिचारिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT