मुंबई

कोल्ही शाळेस जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट

CD
कोल्ही शाळेस जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट विरार, ता. २४ (बातमीदार) ः पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी वसई येथील जिल्हा परिषद शाळा कोल्ही येथे भेट देऊन शाळेच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेत २८६ पटसंख्या व ६ शिक्षक कार्यरत असून फक्त तीनच वर्गखोल्या उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे; परंतु नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध नसल्याने जुन्या शाळा इमारतीच्या जागीच नवीन इमारत बांधण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी वैदेही वाढाण यांनी शाळेतील पोषण आहाराची पाहणी केली. तसेच कोरोना प्रतिबंध पाळून आहारवाटपाच्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा चिंचोटी येथे भेट देऊन सदर शाळेबाबत समस्या जाणून घेतल्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी, माजी सभापती महिला व बालकल्याण नमिता राऊत, उपशिक्षणाधिकारी जनाथे, कार्यकारी अभियंता शिंदे, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT