air pollution in mumbai
air pollution in mumbai sakal media
मुंबई

मुंबईची हवा ‘तीव्र प्रदूषित’; श्वसनाच्या आजारांत वाढ

भाग्यश्री भुवड

मुंबई : शहर आणि उपनगरांतील हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० ते ६०० च्या दरम्यान नोंदला गेल्याने सोमवारी मुंबईकरांचा (Mumbai) श्वास रोखला गेला. अशा स्थितीत वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्य सांभाळण्याची सूचना केली आहे. सोमवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक तीव्र प्रदूषित (Air pollution in mumbai) होता, असे ‘सफर’ या संस्थेने म्हटले आहे. शहरात रविवारी सकाळी गारवा होता; परंतु हवा प्रदूषणामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. रविवारी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३३३ अर्थात अतिशय वाईट नोंदवण्यात आला. सोमवारीही (climate change) वातावरणातील बदलांमुळे हवा गुणवत्ता निर्देशांक ५०२ म्हणजेच तीव्र प्रदूषित नोंदला गेला.

आखातातील धुळीचे वादळ गुजरात ओलांडून महाराष्ट्रात धडकले. त्यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा अतिशय वाईट स्तरावर गेला. माझगाव आणि मालाडमधील हवा खराब नोंदली. २०२१ मध्ये अनेकदा हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत वाईट नोंदला गेला होता. मुंबईतील प्रदूषणाची तुलना दिल्लीतील प्रदूषणाशी करण्यात आली होती. कोरोना काळात थंडीमुळे सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत आहे. अशा वेळी अस्थम्याची व्याधी जडलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जे जे रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र डॉ. मधुकर गायकवाड यांनी केले आहे

मुंबई - ५०२ एक्यूआय - तीव्र प्रदूषण अंधेरी - ४९३ एक्यूआय - तीव्र प्रदूषण चेंबूर -  ६०१ एक्यूआय - तीव्र प्रदूषण बीकेसी - ४४५ एक्यूआय - तीव्र प्रदूषण बोरिवली - ४६३ एक्यूआय - तीव्र प्रदूषण मालाड - ४८० एक्यूआय - तीव्र प्रदूषण कुलाबा - ५४४ एक्यूआय - तीव्र प्रदूषण माझगाव - ६०८ एक्यूआय - तीव्र प्रदूषण वरळी - ४२५ एक्यूआय - तीव्र प्रदूषण भांडुप - ४९४ एक्यूआय - तीव्र प्रदूषण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT