police fir sakal media
मुंबई

मुलांचे अश्लिल व्हिडीओ प्रसारीत करण्यावर गुन्हा; आरोपीचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सोशल मीडियावर (Social media) लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ (Abusive video) प्रसारित करणाऱ्या व्यक्तीविरोधात नवी मुंबई पोलिसांच्या (Navi mumbai police) सायबर सेलने (cyber cell) सीबीडी पोलिस ठाण्यात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. दत्ता बळिराम पडवळ असे त्‍याचे नाव असून ऑगस्ट २०२० मध्ये त्‍याने समाजमाध्‍यमांवर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले होते.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाने शोध घेतला सीबीडीतील आग्रोळी भागात राहणाऱ्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे आढळले. याबाबतची माहिती महाराष्ट्र सायबर सेलने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला दिल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने माहिती घेत ही व्यक्‍ती दत्ता बळिराम पडवळ असल्याचे आढळले. त्यामुळे सायबर सेलने दत्ता पडवळ याच्या विरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीला अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT