मुंबई

दरबार भरवणाऱ्या भोंदूबाबाला अटक

CD
जळगावच्या भोंदूबाबाला डोंबिवलीत अटक महिलांना ३२ लाखांचा गंडा; दोन दिवसांची पोलिस कोठडी सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. २४ : कुटुंबावर करणी झाल्याचे सांगत महिलांना ३२ लाख रुपयांचा जळगावच्या भोंदूबाबाने गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, भोंदूबाबा पवन पाटील याला डोंबिवलीतून अटक केली, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी भोंदूबाबाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र पाटील याला अटक केल्याची माहिती दोन दिवसांनंतर का जाहीर करण्यात आली, हे कारण गुलदस्त्यात आहे. कळवा येथे राहणारे राणे कुटुंब डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात राहते. या कुटुंबातील आजारी व्यक्तीला बरे करण्यासाठी आणि कुटुंबावर करणी झाल्याचे सांगत जळगाव येथील पवन पाटील (वय २८) याने त्यांच्याकडून पैसे आणि सोन्याचे दागिने असे एकूण ३२ लाख रुपये उकळले आहेत. डिसेंबर २०१९ पासून पवन या कुटुंबाची फसवणूक करत होता. आपली फसवणूक झाल्याचे समजताच राणे कुटुंबीयांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि शुक्रवारीच पवन याला अटक केली. पवन याचे १२ वी शिक्षण झाले असून झटपट पैसे कमावण्यासाठी तो हे काम करीत होता. जळगावमध्ये त्याने अनेक नागरिकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. त्याचा उलगडा करण्यासाठी रामनगर पोलिस ठाण्याचे पथक जळगाव येथे लवकरच रवाना होणार आहे. मात्र तो डोंबिवलीत कधी आणि कोणत्या कारणासाठी आला होता, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याविषयी पोलिसांना विचारले असता केवळ डोंबिवलीतून त्यास अटक करण्यात आली एवढेच बोलून पोलिसांनी अधिक माहिती देण्याचे टाळले. उद्या (ता. २५) पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. चौकट जळगावला पवन भरवतो दरबार पवन हा जळगावला दरबार भरवत असून आपल्या अंगात सप्तश्रृंगी माता येत असल्याचे सांगत तो नागरिकांची दिशाभूल करत असे. हातातून खडीसाखर, कुंकू काढून दाखवणे, चांदीची देवीची मूर्ती काढून दाखवत असे. तसेच त्याचे म्हणणे ऐकले नाही तर देवीचा कोप होईल, अशी भीती तो नागरिकांना घालत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT