मुंबई

४ बारबालासह १३ जण ताब्यात

CD
सीबीडीतील लेडीज बारवरील धाडीत १३ जण ताब्यात नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : सीबीडी पोलिसांनी सीक्वेन्स या लेडीज बारवर रविवारी मध्यरात्री छापा मारून १३ जणांना ताब्यात घेतले आहे. या बारमधील महिला या ग्राहकांसोबत अश्‍लील हावभाव व अंगविक्षेप करत असताना आढळून आल्याने तसेच बार रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. सीबीडी सेक्टर- १५ भागात सीक्वेन्स नावाचा लेडीज बार आहे. या बारमध्ये काम करणाऱ्या महिला ग्राहकांशी अश्‍लील चाळे व हावभाव करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सीबीडी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास साध्या वेशात जाऊन त्याबाबत खातरजमा केली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक पढार व त्यांच्या पथकाने या बारवर छापा मारला. बारमध्ये काम करणाऱ्या महिला कोरोना नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्या. हा बार उशिरापर्यंत सुरू असल्याने पोलिसांनी बारमध्ये काम करणाऱ्या चार महिलांसह बारचा मॅनेजर व वेटर अशा एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. चौकट वाशीतील स्पा मसाज पार्लरवर कारवाई नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : वाशी रेल्वे स्टेशनलगतच्या एलोरा स्पा या मसाज सेंटरवर वाशी पोलिसांनी छापा मारून तीन महिलांना ताब्यात घेतले. मसाजच्या नावाखाली ग्राहकांशी अश्‍लील चाळे करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोगस ग्राहक पाठवून पोलिसांनी कारवाई केली. या स्पावर वाशी पोलिसांनी जून २०२० मध्येसुद्धा अशाच प्रकारची कारवाई केली होती. हावरे इन्फोटेक पार्कमधील एलोरा स्पा या मसाज सेंटरमध्ये अनैतिक धंदे सुरू असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर सोनटक्के यांनी खातरजमा करून छापा टाकला. ग्राहकांकडून एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेऊन त्यांच्याशी अश्‍लील व बीभत्स चाळे करण्यात येत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी स्पामधील महिला, तसेच मसाज पार्लर चालवणारी महिला या चौघांविरोधात अनैतिक धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT