मुंबई

वडिलांना बरे करण्यासाठी भोंदूबाबाने मागितली सोन्याची जिभ

CD
वडिलांना बरे करण्यासाठी भोंदूबाबाने मागितली सोन्याची जीभ रामनगर पोलिस जळगावला रवाना सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. २५ : डोंबिवलीतील एका कुटुंबाला जळगावच्या भोंदूबाबाने ३२ लाखाला गंडा घातला आहे. याप्रकरणी पवन पाटील या भोंदूबाबाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी यांच्या वडिलांना बरे करण्यासाठी पवनने त्यांना देवाला सोन्याची जीभ ओवाळून टाकावी लागेल, अशा भूलथापा दिल्या असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी रामनगर पोलिसांचे एक पथक जळगावला रवाना झाले आहे. डोंबिवलीतील महिलेच्या तक्रारीवरून पवन पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा तपास रामनगर पोलिसांनी सुरू केला आहे. या पथकाने पवन याचे बॅंक खाते गोठवले असून त्यामध्ये १० ते ११ लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पथकाने आठ ते १० तोळे सोनेदेखील हस्तगत केले असल्याची माहिती रामनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली. फिर्यादी यांची नोकरी गेली होती, त्यात त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती. पवन याने वडिलांना बरे करण्यासाठी देवाला सोन्याची जीभ ओवाळून टाकावी लागेल, असे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. तसेच त्यासाठी घरात होमहवन करण्यास सांगितले. ही सोन्याची जीभ सव्वापाच ग्रॅमची मागितली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. चौकट आरोपीच्या मित्रांमुळेच भांडाफोड आरोपीचा मित्र राकेश पाटील याने फिर्यादी यांना फोन करून हा भोंदूबाबा असून त्याच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. फिर्यादींनी त्यानुसार माहिती काढली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

SCROLL FOR NEXT