robbery Crime esakal
मुंबई

गटाराचे झाकण चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड; CCTV मुळे आरोपीला अटक करण्यात यश

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : मुख्य रस्त्यावरील गटारावरील लोखंडी झाकण (Iron lid robbery) चोरी करणाऱ्या टोळीचा (Gang busted) वसईत भांडाफोड झाला आहे. या टोळीतील एका आरोपीला पकडण्यात यश आले असून, दोघे जण फरारी झाले आहेत. याबाबत वसई पोलीस ठाण्यात (Vasai police station) गुन्हा दाखल केला आहे. अटक आरोपीला गुरुवारी वसई न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली.

वसई-विरार महापालिकेच्या वतीने शहरातील अनेक भागांत गटाराचे नियोजित काम झाले आहेत. गटाराच्या चेंबरवर लोखंडी झाकण लावले आहेत, पण हेच लोखंडी झाकण चोरणारी टोळी शहरातील विविध भागांत मागच्या काही महिन्यांपासून सक्रिय झाली होती. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील श्याम शिवाजी पाटोळे (वय १९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो वसईच्या राणगाव लहुपाडा येथील रहिवासी आहे. तो टेम्पोचालक असून त्याच्याच टेम्पोत चोरलेले झाकण नेल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. श्याम याची कसून चौकशी केली असता त्याने झाकण चोरल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून ६० हजार किमतीचे ४ लोखंडी झाकणही जप्त केले आहेत. चौकट स्थानिकांच्या जागरूकतेमुळे आरोपी अटकेत डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्सेस गावात मुलारवाडी परिसरातील गटाराच्या चेंबरवरील लोखंडी झाकण चोरी झाले होते. झाकण चोरी करून, ते टेम्पोत टाकून घेऊन जातानाचे दृश्य एका बंगल्याच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. गावकऱ्यांनी हा व्हिडीओ व्हायरल करून याबाबत जनजागृती केली होती. बुधवारी हा आरोपी पुन्हा मार्सेस गावात आपला टेम्पो घेऊन गेला असता, गावकऱ्यांनी त्याला ओळखले. त्यानंतर त्याला पकडून ठेवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT