marriage  sakal media
मुंबई

आंतरजातीय विवाहाला सामाजिक न्याय विभागाचे आर्थिक पाठबळ

आंतरजातीय विवाहाला आर्थिक पाठबळ; मुंबई विभागात २४९६ जोडप्यांना आठ कोटी ८३ लाखांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : समाजातील अस्पृश्यता निवारण्याचा भाग म्हणून राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत (department of social justice) आंतरजातीय विवाहास (inter caste marriage) प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसाह्य दिले जाते. १९५८ पासून समाज कल्याण विभागामार्फत ही योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला योजनेंतर्गत १५ हजार रुपये इतके अर्थसाह्य दिले जात होते. २०१० पासून अर्थसाह्यात वाढ करण्यात आली असून सद्यःस्थितीत आंतरजातीय जोडप्यास प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अर्थसाह्य (Financial help) दिले जात आहे. दोन वर्षांमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुंबई विभागातील तब्बल २४९६ जोडप्यांना (couple from mumbai) ८ कोटी ८३ लाख रुपयांचे वाटप केले आहे.

यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्‍ह्यांतील जोडप्यांचा समावेश आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जोडप्यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन समाजकल्याणच्या मुंबई विभागीय प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे. योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास आंतरजातीय विवाह समजला जातो. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आंतरजातीय विवाहित जोडप्यांच्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून सरकारची मान्यता आहे.

मुंबई विभागातील मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी ही योजना समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई चेंबूर या कार्यालयामार्फत राबविली जाते. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्‍ह्यांत ही योजना जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविली जाते. सदर योजनेत केंद्र व राज्य यांचा हिस्सा ५०:५० इतका आहे. मुंबई विभागातील योजनेची माहिती जिल्हा लाभार्थी वितरित कोटींमध्ये १ मुंबई शहर/ उपनगर ८०० २००. ००० २ ठाणे ५२६ १९८. ६८ ३ पालघर १८९ ९४. ५० ४ रायगड ५५३ १७७. ४५ ५ रत्नागिरी २०४ १०२. २५ ६ सिंधुदुर्ग २२४ ११०. ९५ एकूण २४९६ ८८३. ८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT