मुंबई

आदित्य ठाकरे यांनी घेतली पनवेलच्या विद्यार्थ्यांनिची दखल

CD
आदित्य ठाकरेकडून पनवेलच्या विद्यार्थिनीची दखल शाळेचे नरमाईचे धोरण; परीक्षेस बसायला अनुमती नवीन पनवेल, ता. १ (वार्ताहर) ः शहरातील सेंट जोसेफ शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या गुंजनचे काही महिन्यांचे शैक्षणिक शुल्‍क बाकी होते. त्‍यामुळे शाळेने सराव परीक्षेसाठी बसता येणार नाही असे सांगितले होते. गुंजनचे वडील नसून घरची परिस्‍थिती हालाखीची आहे. आई एकटी कमावती असल्‍याने शुल्‍कात सवलत देण्याची मागणी त्‍यांनी केली होती. शाळेनेही फी मध्ये सवलत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र फी भरली नाही तर दहावीच्या सराव परीक्षेला बसता येणार नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी अचानक सांगितले. खूप विनवणी करूनही शाळा जुमानत नसल्याने शेवटी पालकांनी युवासेना प्रमुख, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री यांना मेल करून मदत मागितली. रायगड व नवी मुंबई येथील काम पाहणारे युवासेनेचे सहसचिव रूपेश पाटील यांना युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्यामार्फत पालकांची भेट घेत समस्‍या जाणून घेतली. तसेच रायन शाळेच्या प्रमुख आलीस यांच्याकडेही याबाबत विचारणा केली. शिवाय प्रश्‍न तातडीने न सोडविल्‍यास आंदोलनाचा इशारा दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच शाळेने पालकांना बोलावून परीक्षेचा फॉर्म भरून घेतला व फी बाबत सवलत युवासेनेची मागणी मान्य केली. शाळा किंवा महाविद्यालयात विद्यार्थांना फीसाठी त्रास दिला जात असल्‍यास तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन रूपेश पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT