contaminated water
contaminated water sakal media
मुंबई

खारघर: दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; पोटदुखीच्या रुग्‍णांत वाढ

सकाळ वृत्तसेवा

खारघर : गेल्‍या १५ दिवसांपासून खारघर सेक्टर १२ मध्ये दूषित पाणीपुरवठा (contaminated water supply) होत आहे. त्‍यामुळे उलटी, जुलाब आणि पोटदुखीचे आजार बळावले असून अनेक रुग्‍णांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याबाबत तक्रार करूनही सिडकोकडून (cidco) दुर्लक्ष करण्यात येत असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. खारघर सेक्टर १३ मधील सिडकोच्या बीयूडीपी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त, दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे उलटी, जुलाब आणि पोटदुखीचे रुग्ण (patients increases) वाढले आहेत. घरोघरी रुग्ण आढळत आहेत.

सिडकोकडून विविध कामांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. याच ठिकाणाहून मलनिस्‍सारण वाहिनी जात असल्‍याने गळतीमुळे दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. याबाबत पाच दिवसांत उपाययोजना न केल्‍यास सिडको कार्यालयासमोर उपोषण करणार असल्‍याचे पत्र सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे यांनी दिले आहे. याबाबत परिसरातील डॉक्‍टरांकडे विचारणा केली असता, दूषित पाणी अथवा उघड्यावरील खाद्य पदार्थाच्या सेवनामुळे उलटी, जुलाब आणि पोटदुखीचे आजार होऊ शकतात. मात्र उपचारासाठी येणारे रुग्ण हे सेक्टर बारामधील असून हा प्रकार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे स्थानिक नगरसेवक रामजी बेरा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी २० जानेवारी रोजी खारघरमधील सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी चेतन देवरे यांची भेट घेऊन दूषित आणि दुर्गंधीयुक्‍त पाणी पुरवठ्याबाबत पुराव्यासह तक्रार केली. तसेच जलवाहिनीतील तांत्रिक दोष दूर करण्याबाबत निवेदन दिले.

ज्या सोसायटीत दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्या सोसायटीमध्ये सिडकोकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जलवाहिनीला कुठे गळती लागली आहे, याचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही समस्या दूर केली जाईल.

- नाणिक चौटानी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, सिडको.

खारघर सेक्टर १२ मध्ये पंधरा दिवसांपासून उलटी, जुलाब आणि पोटदुखीचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. दूषित पाणी पुरवठ्यामुळे रुग्‍ण वाढण्याची शक्‍यता आहे.

- डॉ. उदय टाळणीकर, सेक्टर- १२.

परिसरात होत असलेल्या पाण्याला दुर्गंधी येते. दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे परिसरात उलटी, जुलाबाचे रुग्ण वाढले आहेत. वडिलांना रात्री उलटी-जुलाबाचा त्रास होत असल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. याबाबत सिडकोकडे तक्रार केल्‍यास काम सुरू असल्‍याचे सांगण्यात येते.

- रूपेश चव्हाण, रहिवासी, श्वेतगंगा सोसायटी, सेक्टर- १२.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT