मुंबई

नारायण मेघाजी लोखंडेंचा पुतळा बसवा!

CD
नारायण मेघाजी लोखंडेंचा पुतळा बसवा! वडाळा, ता. ३१ (बातमीदार) ः मुंबई कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्यकर्तव्याची आजपर्यंत स्मारकरूपाने मुंबई शहरांमध्ये दखल घेण्यात आली नाही, ही खेदजनक बाब असल्याचे सांगून पुतळा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन कामगार व कामगार चळवळीचे नेते भावी पिढीला दिशा देतील. त्यासाठी हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथील आवारात नारायण मेघाजी लोखंडे यांचा पुतळा बसविण्यात यावा, यासाठी नारायण मेघाजी लोखंडे स्मृती विचार मंच या संस्थेचे अध्यक्ष सुदाम गाडेकर यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांची सोमवारी (ता. ३१) त्याच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतू गोपीनाथ लोखंडे यांनी राजाराम सूर्यवंशी लिखित लोखंडे यांचे चरित्र दिले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी जगन्नाथ कुदळे, प्रमुख सल्लागार नवनीत सिनलकर, दत्तात्रय माळी, सचिन नागवेकर आदी उपस्थित होते. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

FIFA World Cup 2026: 52 वर्षांची प्रतीक्षा संपली! World Cup मध्ये काँगोने रचला इतिहास; आता थेट इंग्लंडशी भिडणार

Amazon Prime Day 2026 : अर्ध्या किंमतीत मिळतायत 'हे' 5 प्रीमियम मोबाईल; सेल येण्याआधीच डील्स झाल्या लिक

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

Marathi Book Review : वाचनप्रेमींसाठी चार नवी पुस्तके; प्रवास, कथा आणि अध्यात्माचा अनोखा संगम

SCROLL FOR NEXT