मुंबई

गिरीश महाजन यांना दिलेला दिलासा कायम

CD
गिरीश महाजन यांना दिलेला न्यायालयाचा दिलासा कायम सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३१ : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसंबंधित प्रकरणात धमकी दिल्याचा आरोप असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन यांना दिलेला दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवला. महाजन यांच्यावर १५ फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने आज पुण्यातील कोथरूड पोलिस विभागाला दिले. महाजन यांच्यासह अन्य दोघांनी यासंबंधी दाखल झालेला गुन्हा रद्दबातल करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. सोमवारी न्या. प्रसन्ना वारळे आणि न्या. अनिल किल्लोर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. जळगावमधील निभोरा पोलिस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त ॲड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे; परंतु घटना पुण्यात घडली असल्याने तक्रार पुण्यात नोंदविण्यात आली. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या कथित घटनेवर डिसेंबरमध्ये २०२० मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या कथित घटनेवर ही फिर्याद केली आहे, एवढ्या उशिरा तक्रार केल्याने ती रद्द करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे, असा दावा महाजन यांच्यावतीने करण्यात आला आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT