Wedding sakal
मुंबई

लग्नाच्या गाठी स्वर्गात नव्हे, नरकात बांधल्या जातात : मुंबई हायकोर्ट

पती-पत्नीतील वादावर उच्च न्यायालयाची टिपण्णी

CD

मुंबई : पती-पत्नीमधील वादाची परिसीमा पाहून लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी केली. तसेच या प्रकरणात पतीला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. नवी मुंबईत राहणाऱ्या पतीने पत्नीकडून दाखल केलेल्या कौटुंबिक छळ आणि हुंडा मागितल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

पतीकडून आपल्याकडे सोन्याच्या नाण्यांची मागणी करण्यात आली. त्यासाठी मारहाणही करण्यात आली. तसेच घरासाठी सुमारे १३ लाख रुपयेदेखील दिल्याचा दावा पत्नीने तक्रारीत केला होता. या आरोपांचे पतीच्या वतीने ॲड. रेशम सहानी यांनी खंडन केले.

घरासाठी ९० लाख रुपयांचे कर्ज काढले होते, तसेच पत्नीने केवळ घरातील इंटेरिअरचा खर्च केला. याशिवाय तिला फिरायला मॉरिशसला नेले, महागडा मोबाईलदेखील दिला, असे पतीकडून सांगण्यात आले. या दोघांमधील भांडणे पाहता ती विकोपाला गेली आहेत आणि ते एकत्र राहणे शक्य नाही. तसेच या प्रकरणात पतीला कोठडी मिळण्याची आवश्यकता नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने पतीला ३० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

पती-पत्नींमध्ये लहान-सहान कारणांवरून वाद, भांडणं होत असतात. काही पती-पत्नीमध्ये ती सातत्याने होतात. परिणामी त्यांचे संसारही तुटतात. त्यामुळे लग्नाच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात असे वाटते, असा शेरा न्यायालयाने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT