मुंबई

न्यायालय आदेशाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही

CD
खारफुटी जमीन हस्‍तांतरण न्यायालय आदेशाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३१ : खारफुटीची जमीन राज्याच्या वन विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), च्या ताब्यात घेण्याचे आदेश २०१८ रोजी न्यायालयाने दिले होते. तरीही याकडे कानाडोळा करणाऱ्या संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, अशी ताकीद मुंबई उच्च न्यायालयाने आज प्रशासनाला दिली. मात्र, त्या आदेशाला केराची टोपली दाखवत संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी न्यायालयाच्या आदेशाला कानाडोळा करीत आहेत. यापुढे असे आढळून आल्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला धारेवर धरले. मुंबईसह आसपासच्या परिसरात खारफुटी जमिनींचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात येत आहे. विविध प्राधिकरणाकडून यावर जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करण्यात येत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका ‘वनशक्ती’ या संस्थेच्या वतीने न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने सर्व खारफुटी क्षेत्रांना वन्य विभाग म्हणून घोषित करून वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशांचे पालन करण्यात आले नसून १५,३११.७ हेक्टरपैकी १३,७१६.७३ हेक्टर जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित १,५९४.९७ हेक्टर जमीन अद्यापही हस्तांतरित करण्यात आळी नसल्याबाबत खंडपीठाच्या निर्दशानास आणून देण्यात आले. समुद्र अथवा पाण्यामार्गे येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी कांदळवनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यावर माहिती दाखल करण्यासाठी सरकारी वकिलांनी आणखी अवधी मागितला. यावर नाराजी व्यक्त करत कोकण विभागीय आयुक्त आणि संबंधित प्राधिकरणांनी १० फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात निर्देश दिले. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT