मुंबई

कोसबडच्या टेकडीवर जुन्या आठवणींना उजाळा..

CD
माजी विद्यार्थी रमले आठवणींत कोसबाडच्या अध्यापक विद्यालयात स्नेहमेळावा बोर्डी, ता. १ (बातमीदार) : अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांच्या कोसबाड येथील नूतन बाल शिक्षण संघाच्या विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे (डी.एड. कॉलेज) २००८-९ या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल १२ वर्षांनंतर स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले. या वेळी त्यांनी येथील शिक्षण घेत असतानाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विकासवाडी अध्यापक विद्यालयाच्या वतीने रविवारी (ता. ३०) माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर हे प्रमुख पाहुणे; तर विद्यालयाच्या प्राचार्या संजना कदम या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच विद्यालयाचे माजी प्राचार्य मनोहर सैंदाणे, संतोष लुले व प्राध्यापक शंकर जोंधळे, सुनील गायकवाड, व्यवस्थापक काशिनाथ कदम, खजिनदार सुधीर कामत, सदस्य संजू जोशी आदी उपस्थित होते. या मेळाव्यास २००८-९ च्या बॅचचे ३० माजी विद्यार्थी हे महाराष्ट्रातील विविध भागांतून कोसबाड येथे आले होते. कॉलेजचे माजी प्राचार्य मनोहर सैंदाणे, संतोष लुले, शंकर जोंधळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी मीनाक्षी सोनार, कीर्ती पाटील, विद्या राऊत, अनुराधा चव्हाण, नरोत्तम भोये आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी झाले भावुक या मेळावा कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी येथे शिकलेल्या शिक्षणाचा अनुभव व त्याचा पुढील आयुष्यात झालेला फायदा सांगत कॉलेजजीवनातील आठवणींना उजाळा दिला. कॉलेजमधील जुने दिवस आठवून अनेक विद्यार्थी भावुक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT