मुंबई

भिवंडीत जिलेटीनसह डीटोनेटर स्फोटक विक्री करीता आलेल्या त्रिकुट गजाआड.

CD
स्फोटके विक्रीसाठी आलेले त्रिकुट गजाआड भिवंडी, ता. १ (बातमीदार) ः भिवंडी शहरातील नदीनाका येथे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने मारुती कारमधून प्रतिबंधित स्फोटकांची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली. या वेळी जिलेटिन आणि डिटोनेटर जप्त केले. भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सचिन गायकवाड यांना याबाबत माहिती मिळाली. विशेष पोलिस पथकाने भिवंडी-वाडा महामार्गावरील नदीनाका भागात सापळा लावला. त्यात कारला अडवून अल्पेश ऊर्फ बाल्या हिराजी पाटील, पंकज अच्छेलाल चौहान, समीर ऊर्फ सम्या रामचंद्र वेडगा यांना ताब्यात घेतले. या वेळी कारमधील पाच खोक्यांमध्ये १००० नग जिलेटिन कांड्या, १००० नग डिटोनेटर हस्तगत करण्यात आले. या वेळी चार लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

Panchang 17 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Gulabrao Patil: केंद्राने निधी अडवल्याने ‘जलजीवन’ला खीळ; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती, २५ हजार ६१ योजनांची कामे ठप्प!

अग्रलेख : बाहुली बोलकी झाली…

SCROLL FOR NEXT