marriage ceremony esakal
मुंबई

लग्नाला ५० वऱ्हाडी; इतरांचा घरातूनच थाट!

लग्‍नाळूंना वेध निर्बंध शिथिल होण्याचे कोरोना रुग्‍णांची संख्या कमी झाल्‍याने प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

शुभांगी पाटील

तुर्भे : माघ महिना सुरू होताच लग्नाचा धूमधडाका (Marriage ceremony) सुरू होतो. मध्यंतरी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या (corona new patients) झपाट्याने वाढल्‍याने लग्‍न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांवर (public events) प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले. त्यात लग्न सोहळ्यासाठी ५० जणांचीच परवानगी देण्यात आली आहे. जास्त वऱ्हाडी आढळल्‍यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली तरी लग्न सोहळ्यासाठी प्रशासनाकडून (Government restrictions) लावलेले निर्बंध ‘जैसे थे’ असल्याने वर-वधूकडील मंडळींना लग्‍न समारंभासाठी कुणाला बोलवावे, कुणाला टाळावे, असा प्रश्‍न पडला आहे.

सध्या तरी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. दीड-दोन वर्षांपासून लग्‍नासाठी इच्छुकांनाही यंदाही मोजक्याच वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत साजरे करावे लागणार असल्याने उपवर-उपवधू मंडळींचा हिरमोड झाला आहे. अनेकांना आपला लग्न सोहळा मोठ्या थाटात करावयाचा आहे; परंतु निर्बंधामुळे केवळ ५० जणांनाच परवानगी आहे. त्यामुळे कधी एकदाचे निर्बंध हटविले जातील आणि लग्नाचे बार धूमधडाक्यात उडविले जातील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दोन वर्षांपासून लग्न सोहळ्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. नातेवाईकांचे नाराजी नाट्य घरातील पहिले लग्न असल्याने धूमधडाक्यात वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत साजरे व्हावे, अशी काहींची इच्छा आहे. त्‍यामुळे दोन वर्षांपासून लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या असून आता निर्बंध शिथिल होण्याची वाट पाहत आहेत. अनेक वधू-वराच्या नातवाईकांची संख्याच शंभरच्या वर जात असल्‍याने कुणाला बोलवावे, कुणाला टाळावे, असा प्रश्‍न कुटुंबीयांना पडला आहे. नातेवाईकांचे नाराजी नाट्य टाळण्यासाठी विवाहेच्छुक अनेकांनी लग्‍नाच्या तारखाच काढलेल्‍या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT