police fir sakal media
मुंबई

पालघर : अनधिकृत बांधकाम पाडणे भोवले; १५ जणांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पालघर : तालुक्यामधील पाम ग्रामपंचायतीकडून (Pam gram panchayat) वहिवाटीच्या जागेवर बेकायदेशीररीत्या बांधकाम पाडल्याप्रकरणी (construction illegally demolish) सरपंच आणि ग्रामसेविकेला महागात पडले आहे. या दोघांसह अन्य १५ जणांविरोधात सातपाटी सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (police complaint filed) करण्यात आला आहे. पाम गावात चिंतामण पाटील व कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनीवर परवानगी न घेता ग्रामपंचायत चावडी उभारली आहे. तेथील उर्वरित जागेवर अतिक्रमण होत असल्याने पाटील कुटुंबीयांनी ग्रामपंचायत चावडी सोडून उर्वरित जागेला लोखंडी गेट लावले होते.

त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती. सदर विषय ग्रामपंचायतीने ग्रामसभेत चर्चेस येऊन परवानगी नाकारल्याचे फिर्यादीचे म्हणणे होते. त्यावर चिंतामण पाटील यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख पालघर यांच्या कार्यालयाकडे जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता. या संदर्भात पाम ग्रामपंचायतीने पालघर तहसीलदारांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. तहसीलदारांनी दिलेल्या लेखी उत्तरातील मजकुराचा वेगळा अर्थ काढून संरक्षण भिंत तोडून संपूर्ण कुंपण तोडून गेट आणि इतर साहित्य चोरून नेल्याची तक्रार पाटील यांनी सातपाटी सागरी पोलिसांकडे २०२१ मध्ये केली होती.

पाम ग्रामपंचायतीने पालघर तहसीलदारांकडे मोकळ्या जागेत झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे पत्र दिले होते; तर दुसरीकडे सातपाटी सागरी पोलिसांनीही तहसीलदारांकडे मार्गदर्शन मागवले होते. यावर तहसीलदारांनी ग्रामपंचायतीने त्यांच्या ताब्यात असलेल्या गायरान व गुरुचरण जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविले होते. मात्र पाम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पिंपळे, उपसरपंच भूषण पिंपळे, ग्रामसेविका अल्पना पाटील, सदस्य अमित संखे, राकेश पिंपळे, मिलिंद वडे, ग्रामपंचायत कर्मचारी श्यामकुमार वडे, भावेश पिंपळे, रूपाली संखे आणि रवींद्र राऊत अशा १७ जणांनी पाटील यांच्या मालकीच्या जागेवरील भिंत, लोखंडी गेट, नामफलक हे जेसीबीच्या साह्याने तोडून नुकसान केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामपंचायतीने कायदेशीररीत्या कारवाई केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

- प्रभाकर पिंपळे, सरपंच, पाम ग्रामपंचायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate will be arrest : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

मेल-एक्सप्रेस आणि लोकलच्या संख्येत वाढ, प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन 238 ऑटोमॅटिक डोअर गाड्या... प्रवाशांसाठी मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला; अटकेसाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना

SCROLL FOR NEXT