Mumbai sakal media
मुंबई

ऑन ड्युटी : छायाचित्रांतून रात्रीच्या मुंबईची रम्य सफर घडवणारे राजू धुरी

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई पोलिस दलात (Mumbai police) कलाकारांची खाण आहे. त्यांपैकी एक आहेत राजू धुरी. पोलिसी कर्तव्य बजावून धुरी (police raju dhuri) यांनी छायाचित्रणाचा छंद जोपासला आहे. ते सध्या मुंबई पोलिसांच्या `सीआयडी` (cid) विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. धुरी यांना मुंबईचे सौंदर्य आपल्या कॅमेरात कैद (photography of mumbai) करायला आवडते. गेली ३५ वर्षें ते छायाचित्रण करतात. १९८९ मध्ये पोलिस दलात दाखल झालेल्या धुरी यांनी त्याआधी १९८५ मध्ये छायाचित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते.

Mumbai lights

रात्रीचे लाईट्‌स आणि त्यात दिसणारी मुंबई ही दिवसापेक्षा जास्त मनमोहक आणि भुरळ घालणारी वाटते. त्यामुळे राजू धुरी यांचे ९० टक्के फोटो हे रात्रीच्या मुंबईची सफर घडवतात. धुरी यांना `एरियल` फोटोग्राफी करायला आवडते. राज्याचे मुख्यमंत्री आणि छायाचित्रकार असलेले उद्धव ठाकरे हे त्यांचे आदर्श आहेत. त्यांचे आकाशातून किंवा उंच ठिकाणाहून घेतलेले छायाचित्र (एरियल फोटो) बघून धुरी या छायाचित्र प्रकाराच्या प्रेमात पडले आणि आपणही तसेच करायचे असे ठरवून त्यांनी या एरियल फोटोग्राफीला सुरुवात केली.

Mumbai csmt

मुंबईतील जपळपास २५० ठिकाणे त्यांनी अशा प्रकारे फोटोंमध्ये कैद केली आहेत. मुंबईतील एखाद्या ठिकाणाचा फोटो घ्यायचा असेल तर धुरी हे त्याच्या जवळपास असलेल्या उंच इमारतीचा वापर करतात. त्या इमारतीवर जाऊन ते त्या ठिकाणचा असा फोटो काढतात की बघणाऱ्याला हेलिकॉप्टरमधून फोटो काढला आहे, असेच वाटते. योग्य अँगल हवा असल्यास प्रसंगी ते ३० मजली इमारतही जिने चढून जातात. काही महिन्यांपूर्वी धुरी यांच्यासह जवळपास २० छायाचित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते.

Police Raju Dhuri

मुंबईचा सी-लिंक हा या प्रदर्शनाचा विषय होता. सी-लिंकचे ३०० पेक्षा जास्त अँगलने काढलेले फोटो या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. त्यावेळी दादरच्या कोहिनूर इमारतीचे ३० मजले धुरी हे दोन वेळा चढून गेले होते. कारण पहिल्यांदा ३० मजले चढून जाईपर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यामुळे फोटोसाठी लागणारा योग्य प्रकाश त्यांना मिळाला नाही. आवडता फोटो ३१ डिसेंबर २०१९ च्या रात्री राजू धुरी यांनी मुंबईतील हॉटेल ताजच्या टेरेसवरून काढलेल्या फोटोला सर्वच वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळाली होती. हा फोटो माझा सर्वात आवडता फोटो असल्याचेही ते सांगतात. छंद म्हणून फोटोग्राफी करत असलो तरीही पोलिसांना जेव्हा गरज असते, तेव्हा त्यांच्यासाठीही फोटोग्राफी करतो. फोटोग्राफी करताना अनेकदा पोलिस दलात असल्याचा फायदा होतो. एखाद्या इमारतीत जाण्यासाठी लवकर परवानगी मिळते.

तरीही पूर्णपणे कायदेशीर परवानगी घेऊनच इमारतीत प्रवेश करतो, असेही ते सांगतात. जहांगिरमध्ये प्रदर्शनाचे प्रयत्न मुंबईतील प्रसिद्ध काला घोडा फेस्टिव्हलमध्येही राजू धुरी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. आतापर्यंत इतर छायाचित्रकारांसोबत प्रदर्शनात धुरी त्यांचे फोटो मांडत आले आहेत; परंतु केवळ त्यांच्याच छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरीत भरवण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. क्रिकेटमध्येही सहभाग राजू धुरी हे उत्तम फोटोग्राफीबरोबरच क्रिकेटमधले चांगले यष्टिरक्षक आणि फलंदाज आहेत. मुंबई पोलिसांची क्रिकेट टीम तयार झाल्यापासून म्हणजे जवळपास गेली १६ ते १७ वर्षे त्यांचा या टीममध्ये सहभाग आहे.

पोलिस दलात काम करताना येणारा ताण घालवण्यासाठी मला फोटोग्राफी मदत करते. कोणताही फोटो काढताना तो नुसता क्लिक करून चालत नाही, तर त्या फोटोचा आणि समोर दिसणाऱ्या गोष्टीचा आधी विचार करावा लागतो. त्यातून एक नवी ऊर्जा मिळते आणि त्यात कामाचा ताण कधी कमी होतो, हे समजतही नाही. - राजू धुरी, उपनिरीक्षक, सीआयडी विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT