मुंबई

तरुणाकडून मैत्रीणीवर बलात्कार

CD
तरुणाकडून मैत्रिणीवर बलात्कार एपीएमसी पोलिसांकडून आरोपीला अटक नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : मुंबईच्या धारावी परिसरात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीला तिच्या मित्राने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे लैंगिक अत्याचारानंतर आरोपी तरुणाने व त्याच्या सहकाऱ्यांनी पीडित तरुणीला भाईंदर येथील एका घरामध्ये डांबून ठेवले होते. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तारीक अन्वर शेख ऊर्फ राजा शेख याच्याविरोधात बलात्कार व डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या गुन्ह्यात आरोपी राजा शेख याला त्याच्या ५ साथीदारांनी मदत केल्याने पोलिसांनी त्यांनादेखील सहआरोपी करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील पीडित तरुणी व तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी राजा शेख तसेच त्याचे साथीदार अबुलेश शेख, नुरेन शेख, जैद अली, जमशेद शेख व सादिक शेख हे सर्वजण धारावी परिसरातील रहिवासी आहेत. राजा शेख याची पीडित तरुणीसोबत मैत्री असल्याने त्याने गत २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तिला फोन करून सायन येथे भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर राजा शेख याने पीडित तरुणीला आपल्या मित्रांच्या मदतीने एपीएमसीतील प्रणव लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडित तरुणीला भाईंदर येथील एका रूममध्ये नेऊन तिला डांबून ठेवले होते. पीडित तरुणीने भाईंदर येथील घरातून सुटका करून घेत धारावी येथील घर गाठल्यानंतर आपल्या नातेवाईकांच्या मदतीने धारावी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार धारावी पोलिसांनी आरोपी राजा शेख याच्याविरोधात बलात्कारासह डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा एपीएमसीच्या हद्दीत घडला असल्याने गुन्हा एपीएमसी पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी राजा शेख याला तत्काळ अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Poisoning Case : मादी बिबट्याचा संशयास्पद मृत्यू, विष घालून मारल्याचा प्राथमिक अंदाज

Janhavi Kandula Case : न्याय मिळाला! अमेरिकेत पोलीस वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या जान्हवीच्या कुटुंबाला 260 कोटींची मोठी नुकसानभरपाई

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये धगधगती कार; शालिमार परिसरात भर रस्त्यात चारचाकीला आग

IND vs PAK : आर अश्विनची 'स्मार्ट' आयडिया! फेकाड्या उस्मान तारिकला 'डिवचण्या'चा फंडा सांगितला! म्हणाला, भारताने तर.. Video

Sakal Property Expo : पुण्यात घर घ्यायची सुवर्णसंधी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ उद्यापासून; गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली

SCROLL FOR NEXT