kalyan dombivali municipal
kalyan dombivali municipal  sakal
मुंबई

विनामास्क, तिकीट कारवाईतून केडीएमटी लखपती

CD

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम (केडीएमटी) आधीच डबघाईला आला आहे. त्याता कोरोनाची भर पडल्याने उपक्रमाचा गाडा हाकताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे; परंतु यातूनही संधी साधत कोरोना निर्बंधांमध्ये विनामास्क, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करून केडीएमटीने लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे केडीएमटीला दिलासा मिळाला आहे.

केडीएमटीच्या ताफ्यात २०० हून अधिक बस असल्या तरी केवळ ४० ते ४५ बस प्रत्यक्ष रस्त्यावर धावतात. कोरोनापूर्वी केडीएमटीला प्रतिदिन ३ लाखांहून अधिक उपन्न मिळत होते. मात्र कोरोना काळात निर्बंधांचा फटका बसल्याने केडीएमटीची मोठी आर्थिक कोंडी झाली. सद्यस्थितीत निवडक मार्गांवरच सेवा दिली जात आहे. त्यातून प्रतिदिन एक ते दीड लाख रुपये प्रतिदिन उपन्न मिळते. एकीकडे उत्पन्न घटत असताना प्रशासनाने विनामास्क, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यानुसार १ एप्रिल २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२२ या काळात पाच हजार २२७ विनामास्क प्रवाशांविरोधात कारवाई करत सुमारे २६ लाख १३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला; तर विनातिकीट प्रवास करणाऱ्या २७८ प्रवाशांवर कारवाई करत सुमारे ३० हजार ८३० रुपये दंड वसूल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT