मुंबई

विकास योजनांच्या जनजागृतीसाठी पथनाट्य

CD

विरार, ता. १३ (बातमीदार) ः जिल्हा परिषदेच्या अनेक चांगल्या योजना तळागाळातील नागरिकापर्यंत पोहचत नाहीत. त्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, त्याचा लाभ नागरिकांना घेता यावा, यासाठी जिल्हा परिषद पालघर विशेष घटक योजनेअंतर्गत विविध विकास योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृती म्हणून विरारच्या माय नाटक कंपनीच्या कलापथक कलाकारांमार्फत वसईत पथनाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
वसईच्या ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनांची माहिती मिळावी म्हणून यामध्ये ११ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान वसई पूर्वेतील सायवन, शिरवली, तिल्हेर, माजिवली, पारोळ शिवनसई, चांदीप, मांडवी, शिरसाड, खनिवडे, सकवार तसेच विरार, सोपारा फाटा, वसई फाटा, पेल्हार, अर्नाळा, कळंब, सत्पाळे या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण विभाग व जिल्हा माहिती कार्यालय, पालघर (अंतर्गत) जनजागरण अभियानातील या पथनाट्याचे दिग्दर्शन महेश सापणे यांनी केले आहे; तर रूपक मराठे, मानसी जाधव, शुभम जादा, अक्षरा मांडवकर, द्वेष पोकळे, मेघना गणगे, भुमिक बांद्रे, तृप्ती सोनावणे, तनिष जाधव, पूजा मोहिते आदी कलाकार पथनाट्य पथकात आहेत.

जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी ही जनजागृती आम्ही करत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी नागरिक पुढे येऊन योजनांची माहितीही जाणून घेत आहेत.
- महेश सापणे, पथनाट्य, दिग्दर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT