मुंबई

प्राण्यांसोबत फोटो, टॅटू, ग्रूमिंग अन्‌ बरंच काही...

CD

ठाणे, ता. १४ (बातमीदार) : व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने ठाणे शहरात मुक्या प्राण्यांप्रति प्रेम व्यक्त करता यावे, याकरिता ‘मीट युअर मॅच’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिटिझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कॅप) या संस्थेच्या माध्यमातून रविवारी (ता. १३) राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. सहभागी प्राणीप्रेमींनी प्राण्यांसोबत फोटो, टॅटू, ग्रूमिंग सेशन करून व्हॅलेंटाईन डेचा आनंद घेतला. या उपक्रमात सुमारे १५० प्राणीप्रेमींनी सहभाग नोंदवून तेथील सुटका केलेल्या प्राण्यांसोबत वेळ घालवला.

ठाण्यातील घोडबंदर रोडजवळील जुने वाघबीळ येथील फ्रीडम फार्म येथे रस्त्यावर सोडलेल्या तसेच जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. कॅप संस्थेच्या वतीने येथे जखमी प्राण्यांवर उपचार तसेच सुटका केलेल्या भटक्या प्राण्यांचे संगोपन करण्यात येते. या ठिकाणीच रविवारी ‘मीट युअर मॅच’ उपक्रमाद्वारे प्राणी आणि मानवामधील भावनिक संबंध प्रथापित करून, मुक्या प्राण्यांप्रति नागरिकांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला.

...असा होता उपक्रम
१) रविवारी सकाळी १० ते १ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत तब्बल १५० प्राणीप्रेमींनी या ठिकाणी भेट दिली. या वेळी प्रत्येकाला प्राण्यांसोबत वेळ घालवण्यासाठी ६० मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यादरम्यान प्राणीप्रेमींसाठी तसेच त्यांच्या प्राण्यांसाठी निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
२) उपक्रमात फेस पेन्टिंग, व्हिगन टॅटू, प्राण्यांचे ग्रूमिंग सेशन, फोटो बूथ आदींचा समावेश होता. प्राणीप्रेमींनी निवारा केंद्रातील मांजर, कुत्रा, गाय, बैल, गाढव, डुक्कर, गिन्नी आदी प्राण्यांसोबत वेळ घालवला. तसेच उपक्रमावेळी एखाद्या प्राण्याला दत्तक घ्यायचे असल्यास तीदेखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.

गेल्या वर्षापासून व्हॅलेंटाईन डेनिमित्त हा उपक्रम आम्ही करीत आहोत. मागील वर्षी ४० प्राणीप्रेमींनी उपक्रमास भेट दिली होती. यंदा या उपक्रमास अनपेक्षित प्रतिसाद लाभून तब्बल १५० प्राणीप्रेमींनी उपक्रमात सहभाग नोंदवला. मानवामध्ये प्राण्यांविषयी करुणा आणि प्रेम भावना वाढावी आणि मुक्या प्राण्यांच्या देखभाल आणि संगोपनाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
- सुशांक तोमर, अध्यक्ष, कॅप फाऊंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT