मुंबई

पालिकेच्या जकात नाका कार्यालयात दारूचा अड्डा

CD

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) ः उल्हासनगर पालिकेच्या मागील बाजूस अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या बाजूला पालिकेच्या बंद असलेल्या जकात नाका कार्यालयात दारूचा अड्डा चालवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिका अधिकारी आणि पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून हा अड्डा उद्धवस्त केला आहे. येथून दोन भरलेले कॅन, ग्लास, बाक जप्त करण्यात आले आहे. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पालिका मुख्यालयाच्या मागेच अग्निशमन दलाच्या बाजूला पालिकेच्या मालकीचे प्रशस्त असे जुने जकात नाक्याचे कार्यालय आहे. महाराष्ट्र सरकारने जकात बंद केल्यावर तीन-चार वर्षांपूर्वी याठिकाणी श्वानांवर नसबंदीची प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र हे कामही निविदेअभावी ठप्प पडल्याने जकात नाका बंद आहे. त्याचा गैरफायदा घेणाऱ्या काहींनी याठिकाणी बाक टाकून गावठी हातभट्टी दारूचा अड्डा थाटला होता. ही माहिती समजताच बुधवारी दुपारच्या सुमारास मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, सहायक आयुक्त तुषार सोनवणे यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या पोलिसांसोबत छापा टाकला. तेव्हा तिथे असलेले तळीराम पळून गेले.

पोलिसांनी घटनास्थळी स्टीलचे लहान ग्लास, हातभट्टी दारूचे दोन भरलेले कॅन, मग सापडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिकेच्या वास्तूला दारूचा अड्डा बनविणाऱ्यांना अटक करण्यात येणार आहे.
- मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT