मुंबई

दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘पाऊली’ खणाणली

CD

डोंबिवली, ता. २६ ः केवळ अभ्यास म्हणून नाही तर आपण घडविणाऱ्या कलाकृतीतून सामाजिक संदेशही घराघरांत पोहोचावा यासाठी दोन वर्षे सतत मेहनत घेणाऱ्या आदित्य फरड याच्या कष्टाने चीज झाले आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘पाऊली’ या लघुपटाला फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘उत्कृष्ट लघुपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या लघुपटाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचे निर्मूलन करायचे असेल तर शिक्षण खूप महत्त्वाचा घटक आहे, असा संदेश देण्यात आला आहे.
वांगणी येथे राहणाऱ्या आदित्य याने ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयांतून २०२१ साली पदवी शिक्षण पूर्ण केले. फिल्म टेलिव्हिजन अॅण्ड न्यू मीडिया प्रॉडक्शन या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असताना ३० मिनिटांचा लघुचित्रपट आम्हाला बनवायचा होता; परंतु हा केवळ महाविद्यालयीन अभ्यासक्रमापुरता मर्यादित न ठेवता तो युथ फेस्टिव्हलमध्ये तो प्रदर्शित करेल, असे आदित्य याने ध्येय ठेवले होते.
आदित्यने सांगितले की, कोरोनाचा काळ असल्याने वांगणी येथे माझ्या गावी या चित्रपटाचे शुटिंग करण्याचे ठरविले. मध्यंतरी लोकल सुरू होताच आम्ही गावी गेलो. तेथे चार ते पाच दिवस राहून चित्रपटाचे शूट पूर्ण केले. गावकऱ्यांनीही आम्हाला यामध्ये खूप सहकार्य केले. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी माहिती असल्याने डिसेंबर महिन्यात आम्ही आमच्या चित्रपटाचीही माहितीही लघुचित्रपट महोत्सव पुरस्कारासाठी दिली होती. लघुचित्रपट निर्मितीचा आमचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्याला ही कौतुकाची दाद मिळाल्याने यापुढेही सामाजिक विषय घेऊन मराठीतील लघुचित्रपटांची निर्मिती करण्याचा आमचा विचार आहे. या पुरस्कारासोबतच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा, नेक्स्टजीएन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव इत्यादी महोत्सवांत देखील या लघुपटाने आपले नाव कोरले आहे.

शिवसेनेकडून कौतुकाची थाप
लघुचित्रपटाच्या निर्मितीत २५ ते ३० जणांचा सहभाग होता. लघुचित्रपटाच्या यशामध्ये या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. लघुचित्रपटाचे लेखन नचिकेत दांडेकर यांनी केले असून संगीत कुशल इनामदार यांनी दिले आहे. नचिकेत दांडेकर, अभिजित दळी हे डोंबिवलीकर असून त्यांचा नुकताच शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सत्कार केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना यापुढे काही मदत लागल्यास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मोरे यांनी यावेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT