मुंबई

दंत महाविद्यालयातील कोरोना सेंटर बंद

CD

अंबरनाथ, ता. २८ (बातमीदार) ः कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने दंत महाविद्यालयाच्या जागेत सुरू केलेले कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंटरमधील सर्व साहित्य उपकरणांची आवराआवर हाती घेण्यात आली आहे. मात्र सर्व साहित्य ठेवायचे कुठे आणि कसे, ही समस्या नगरपालिकेसमोर उभी ठाकली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अंबरनाथच्या चिखलोली भागातील बंद असलेल्या दंत महाविद्यालयात कोविड उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय आरोग्य प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात आले. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी नगरपालिकेने ताब्यात घेतलेले दंत महाविद्यालयाच्या भाडे वसुलीसाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने चार कोटी ५० लाख रुपये भाडे दंत महाविद्यालयाच्या मालकाला देण्याचे आदेश प्रशासनाला नुकतेच दिले आहेत. यासाठी तीन महिन्यांची मुदत पालिका प्रशासनाला दिली आहे. एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने निधी मिळावा, अशी मागणी पालिकेने सरकारला केली आहे. अखेर या निर्णयानंतर गुरुवारपासून नगरपालिका प्रशासनाने दंत महाविद्यालयातील बेड्स, खुर्च्या, पंखे, टीव्ही संच, संगणक वातानुकूलित यंत्रे यांसारख्या साहित्याची आणि उपकरणांची मोजदाद करून मिळेल त्या वाहनांतून साहित्य हलवण्यास सुरुवात केली आहे.

अग्निशमन दलाच्या कार्यालयाचा आधार
कोविड सेंटरमधील साहित्य ठेवायचे कुठे, असा पेच नगरपालिकेसमोर आहे. काही साहित्य नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात, तर काही साहित्य भांडार कार्यालयात ठेवावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT