मुंबई

कुर्ला, चेंबूर येथे भाजपविरोधात निदर्शने

CD

चेंबूर ता. २६ (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीकरिता एकीकडे भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे; तर दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपविरोधात निदर्शने केली.
तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी नवाब मलिक यांना अटक केल्याच्या आरोप करीत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आज कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशनसमोर व पांजरापोळ या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष नीलेश भोसले, अणुशक्तीनगर तालुका अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेविका डॉ. सईदा खान, सना मलिक, कुमुद जयकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या वेळी कुर्ला विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर, शिवसेना नगरसेविका सान्वी तांडेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक, जितेंद्र जाधव तसेच महाविकास आघाडी पक्षांचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, तालुका अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय! विहिरीत उडी मारून केला निषेध

Neeraj Chopra: दुखापतीनंतर नीरज चोप्रा थेट 'या' मोठ्या स्पर्धेतून मैदानात उतरणार! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निवडीबाबत मोठी अपडेट

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

SCROLL FOR NEXT