Bhimesh Mutula At sakal YIN event
Bhimesh Mutula At sakal YIN event sakal media
मुंबई

लग्नाविना बाप झाल्याचा अनुभव! ‘यिन’च्या विद्यार्थ्यांना मिळाली वेगळीच अनुभूती

कृष्ण जोशी

मुंबई : ‘दत्तक घेतलेल्या मूकबधिर मुलीची शस्त्रक्रिया केल्यावर तिने पहिले अक्षर उच्चारले ते ‘पप्पा’. माझे लग्नदेखील (Marriage) झाले नाही, तरीही बाप झाल्याचा रोमांचक अनुभव मला त्या शब्दांनी मिळाला’, अशी मनोरंजक आठवण गरीब रुग्णांसाठी (Poor patients) काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला (Bhimesh mutula) यांनी सांगितली आणि (Young Inspiration Network) ‘यिन’च्या विद्यार्थ्यांना एक वेगळीच अनुभूती मिळाली.

मुतुला यांनी गरीब रुग्णांसाठी केलेली धडपड, त्यांची मेहनत, रुग्णांविषयीची कणव हे त्यांच्या मार्गदर्शनातून दिसल्याने सारेच विद्यार्थी भारावून गेले. रुग्णांसाठी आपण करत असलेले काम, तसेच विविध योजनांचा फायदा कसा घ्यावा, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. २०१५ मध्ये भरसमुद्रात वादळात उपाशीपोटी पंधरा दिवस काढल्याने तेव्हापासून मृत्यूची भीती मनातून निघून गेली, पण वडिलांच्या आजारपणात जवळचे सर्व पैसे संपले, प्रसंगी अनेक कटू अनुभव आले. अनेकांनी जमेल तशी मदत केली, तरी वडिलांनी माझ्या हातात प्राण सोडला. तेव्हापासून ते पाहून गरीब रुग्णांसाठी काहीतरी करावे, हा निश्चय केला आणि कामाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची स्थापना केली. आता रोज रात्री-अपरात्री फोन येतात, पण काम करताना मिळणारे समाधान हे विलक्षण असते, असे मुतुला म्हणाले.

महिलांना होणाऱ्या गर्भाशय मुखाचा कर्करोगाबाबत (एचपीव्ही) समाजात अजून फारशी जनजागृती झालेली नाही. सरकारदेखील त्याबाबत फारसे गंभीर नाही. त्यामुळे आपण स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आदित्य बिर्ला यांनी त्यासाठी सव्वाकोटी रुपये दिले, ‘कॅन्सर पेशंट एड असोसिएशन’ने औषधे-लशींची सोय केली. आतापर्यंत अडीच हजार महिलांना औषधे-लशी दिले. महिलांना या औषधाच्या दोन ते तीन लशी लागतात व त्याचा प्रत्येकी खर्च चार हजार रुपये आहे. हे काम मला संपूर्ण महाराष्ट्रभर करायचे आहे. त्यामुळे ‘यिन’च्या तरुणांनीही अशा कामात मदत करावी, असे आवाहन त्यांनी करताच तरुणांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले.

सरकारच्या आरोग्यविषयक अनेक योजना आहेत. या योजना ज्या रुग्णालयात उपलब्ध आहेत, त्याबाबत अनेकांना माहिती नसते. तसेच ग्रामीण भागातून अनेक लोकांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही. याबाबत मुतुला म्हणाले, की धर्मादाय आयुक्तांच्या योजनेअंतर्गत राज्यात २५० धर्मादाय रुग्णालये आहेत. तेथे किमान दहा गरीब रुग्णांची सोय होऊ शकते. गुगलवर ही रुग्णालये शोधून त्यांना दूरध्वनी करून मोफत उपचार मिळवता येतो. मी आतापर्यंत या योजनेतून पाच हजार रुग्णांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT