मुंबई

मराठी भाषा विभागाच्या ठरावावर कृती नाही

CD

मुंबई, ता. २६ : पालिकेच्या गटनेत्यांनी मुंबई पालिकेत मराठी भाषा विभाग सुरू करण्याचा ठराव करूनही काही वर्षे होत आली आहेत, परंतु अद्याप हा विभाग सुरू झालेला नाही. हा विभाग सुरू करण्याबाबत कोणतेही प्रयत्न पालिकेने सुरू केलेले नाहीत.
पालिकेचा कारभार १०० टक्के मराठीत करण्याचा कायदा आहे; मात्र आजही अनेक प्रशासकीय परिपत्रके इंग्रजीत प्रसिद्ध केली जातात. गेल्या वर्षी मराठी भाषा दिनाच्या निमित्त वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत यांनी पालिकेकडे मराठी भाषा विभाग सुरू होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, सभागृह नेत्या विशाखा राऊत, पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आदींना पत्र पाठवले होते. त्यात मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी भाषा विभाग सुरू करण्याची मागणी केली होती. यानंतर गटनेत्यांमध्ये चर्चा होऊन असा विभाग सुरू करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते; मात्र अद्याप हा विभाग सुरू झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT