मुंबई

मिरा-भाईंदर महापालिकेचा अर्थसंकल्प आज

CD

भाईंदर, ता. २७ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प उद्या (ता. २८) सादर होणार आहे. पालिका आयुक्त हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती राकेश शहा यांच्याकडे सुपूर्द करतील. त्यानंतर स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा होऊन तो अंतिम मान्यतेसाठी महासभेपुढे सादर केला जाईल. गेल्या संपूर्ण वर्षात कोरोनामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम विकासकामांवरही झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी यावेळेच्या अर्थसंकल्पात प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी प्रशासनाने सुमारे १५०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला होता. त्यात सत्ताधाऱ्यांनी वाढ करून तो तब्बल २००० कोटी रुपयांपर्यंत फुगवला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आगामी अर्थसंकल्पात काय दडले आहे, याबाबत उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT