मुंबई

झोपडपट्टी धारकांसाठी नळ योजना

CD

वाशी, ता. २७ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेचे स्वत:चे धरण असतानाही नागरिकांना पालिका हद्दीत अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी अजून सार्वजनिक नळ योजनेच्या माध्यमातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आता प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याची योजना महापालिका आखत आहे. या माध्यमातून प्रत्येक झोपडीमध्ये नळजोडणी दिली जाणार आहे.

नवी मुंबई महापालिका शहरी भाग, गावठाण भाग आणि झोपडपट्टी भाग अशा तीन प्रकारांत याची विभागणी केली गेली आहे. अनधिकृत झोपड्या वाढत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या अधिकृत झोपड्यांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. झोपडपट्टी भागात असलेल्या सार्वजनिक नळांवर तर यामुळे दररोज भांडणे होत असतात. नळजोडणीसाठी झोपडीधारकाकडून छाननी शुल्क व रस्ता खोदाई शुल्क घेतले जाणार नसून केवळ १०० रुपये सुरक्षा अनामत रक्कम घेतली जाणार आहे. या पाणीपुरवठ्याच्या नवीन धोरणामुळे पाणीचोरीचे प्रकार थांबणार आहेत आणि अधिकृत झोपडीधारकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणार आहे.
---
आवश्यक कागदपत्रे
नळजोडणी घेण्यासाठी नळजोडणीचा अर्ज, सर्वेक्षण पावतीची प्रत, आधार कार्डाची प्रत, १ जानेवारी २०११ रोजीच्या अथवा त्यापूर्वीच्या झोपडीची प्राधिकृत वीज कंपनीने वीजजोडणी दिल्याची कागदपत्रे, अभिलेख किंवा देयक अथवा झोपडीसाठी महापालिकेने मालमत्ता कर आकारणी केल्याचा पुरावा ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT