Water Supply sakal media
मुंबई

मुंबई : मढ जेटी परिसरातील पाणीचिंता मिटली; नवीन जलवाहिनीचे काम सुरु

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मार्वे टी जंक्शनपासून आयएनएस हमलामार्गे मढ जेटीपर्यंत (Madh Jetty) जाणाऱ्या नव्या जलवाहिनीच्या (New water pipeline) कामाला नुकताच सुरुवात करण्यात आली. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिक हैराण झाले होते. स्थानिक शिवसेना (shivsena) नगरसेविका संगीता सुतार यांनी याबाबत पालिकेकडे (bmc) पाठपुरावा करून नवीन जलवाहिनीस एप्रिल-मेमध्ये मंजुरी मिळवली होती. हे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने परिसरातील हजारो नागरिकांची पाणी चिंता मिटणार आहे.

हमलापर्यंत यापूर्वी ९० सेंटिमीटर व्यासाची आणि त्यापुढे मढ जेटीपर्यंत ३० ते ६० सेंटिमीटर व्यासाची जलवाहिनी होती. येथे विविध प्रकल्पांचे भराव पडत गेल्याने ही जलवाहिनी २० फूट खाली गेली. त्यामुळे तिची दुरुस्तीही कठीण होत गेली. गेल्या १५-२० वर्षांत या परिसरातील लोकसंख्येतही वाढ झाली असून, मढच्या हवाईदल वसाहतीतही आठ ते १० हजार कर्मचारी आहेत. या सर्वांना हे पाणी अपुरे पडत असल्याने नवीन जलवाहिनीची मागणी जोर धरत होती. त्यानुसार नवीन जलवाहिनीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

आता हमलापासून हरबादेवी मंदिर-हवाईदल स्थानकापर्यंत ९० सेंटिमीटर व्यासाची जलवाहिनी बसवण्यात येणार आहे. त्यापुढे मढ जेटीपर्यंत तिचा व्यास ६० सेंटिमीटर असेल. मार्वे ते मढ जेटीपर्यंत ही वाहिनी १४ किलोमीटर लांब असेल. त्यासाठी सुमारे २६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पातवाडी, धोंडीगाव, वानेला तलाव, मढ कोळीवाडा येथील रहिवाशांना या जलवाहिनीचा फायदा होणार आहे. युवासेनेचे पदाधिकारी आदित्य सुतार यांच्या हस्ते नुकताच या कामाचे उद्‌घाटन झाले. यावेळी मच्छीमार नेते किरण कोळी, शाखाप्रमुख संदेश घरत, ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते मोरेश्र्वर कोळी, कृष्णा कोळी, भास्कर निळा आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT