crime news sakal media
मुंबई

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीचा मृत्यू!

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मानपाडा पोलिस ठाण्यात (Manpada Police station) विनयभंगाच्या आरोपाखाली (Molestation case) अटकेत असलेल्या आरोपीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मानपाडा पोलिस ठाण्यात ५ फेब्रुवारीला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी दत्तात्रय वारके (culprit duttatray warke Death) याचा पोलिस शोध घेत होते. २६ फेब्रुवारीला जळगाव येथून पोलिसांनी त्याला अटक केली होती. रविवारी (ता. २७) त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

दत्तात्रय यास कल्याणमधील आधारवाडी कारागृहात दाखल करण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे अनिवार्य होती. त्यानुसार मानपाडा पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यातील विलगीकरण कक्षात ठेवले होते. विलगीकरणात असताना रविवारी सायंकाळी फिट येऊन तो जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच रात्री त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन अहवालानंतर दत्तात्रय याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT