मुंबई

म्हाडा मुख्यालयातील कार्यालयांना नोटीस

CD

मुंबई, ता. १ : म्हाडाच्या वांद्रे येथील गृहनिर्माण भवन या इमारतीमध्ये शासनाची विविध कार्यालये असून या कार्यालयांनी तब्बल ११५ कोटी ६७ लाखांची रक्कम थकवली आहे. ही रक्कम भरण्यासाठी मुंबई मंडळाने अभय योजना राबविल्यानंतरही अनेक कार्यालयांनी ही रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मंडळाने या कार्यालयांना जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.
म्हाडा मुख्यालयामधील अनेक गाळे शासकीय, अशासकीय संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या पोटी भाडेकरूंकडून म्हाडा भाडे घेते; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विविध कार्यालयांनी भाडे थकविले आहे. यामध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्प, शिवशाही प्रकल्प, उपजिल्हाधिकारी अतिक्रमण अंधेरी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य महिला आयोग, सह दुय्यम निबंधक, सहायक दुय्यम निबंधक, राज्य अपंग विकास महामंडळ, विमा संचालनालय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, शिरस्तेदार अपील अधिकारी, ठेकेदार संघटना आदी कार्यालयांचा समावेश आहे. म्हाडा मुख्यालय इमारतीचा पुनर्विकास करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. पुनर्विकासादरम्यान म्हाडाला जागेची कमतरता भासणार आहे.
त्यामुळे मुख्यालयाची देखरेख करत असलेल्या मुंबई मंडळाने भाडे थकविणाऱ्या कार्यालयांना नोटीस बजावली आहे. थकीत रक्कम तातडीने भरावी आणि कार्यालयाची जागा रिक्त करून देण्याची नोटीस या कार्यालयांना पाठविण्यात आली असल्याचे, अधिकाऱ्याने सांगितले. धारावी पुनर्वसन प्राधिकरणाकडे ११ कोटी ९५ लाख ७० हजार ३४९ रुपये, राज्य महिला आयोगाकडे ९ कोटी ६१ लाख ५८ हजार ६००, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे ९ कोटी ४७ लाख १३ हजार ५४४, विमा संचालनालय १५ कोटी १४ लाख ४१ हजार ६०९, महात्मा फुले मागास आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाकडे १ कोटी १५ लाख ४१ हजार ४९२ रुपये रक्कम थकीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : घनसावंगी पंचायत समितीच्या कामांमध्ये दुमजली कामाचा स्लॅबचा कॉलम पडून मुजराचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT