Thane Mayor Naresh Mhaske Sakal media
मुंबई

ठाणे : कामगार हॉस्पिटलच्या गाळ्यांची चौकशी होणार; महापौर म्हस्के यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शहरात मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरणाचे प्रकल्प (Thane roads Project) हाती घेण्यात आले आहेत. त्यात या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कामगार हॉस्पिटलच्या (Kamgar Hospital) जागेवर गाळे बांधण्यात आले. मात्र बाधित नसलेल्यांनादेखील गाळे देण्यात आले आहेत. दुसरीकडे याच ठिकाणी अतिरिक्त गाळे बांधून त्यांची विक्री केल्याची गंभीर बाब गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के (Mayor Naresh Mhaske) यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांत बाधित होत असलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येते. बाधित झालेल्या नागरिकांसाठी कामगार हॉस्पिटलच्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले. मात्र काही जणांना ताबा मिळाला नसल्याची बाब सभागृह नेते अशोक वैती यांनी महासभेच्या निदर्शनास आणून दिली. निर्धारित प्रमाणापेक्षा १५ ते २० गाळे अतिरिक्त बांधण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आक्षेप घेत हे कोणते धोरण आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी या संपूर्ण कामाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.

मोबदल्यासाठी अतिरिक्त गाळे

ठेकेदाराकडून हे गाळे बांधून ते विस्थापितांना देण्यात आले आहेत. ठेकेदाराने याचा मोबदला म्हणून अतिरिक्त गाळे बांधले असल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT