cyber crime sakal media
मुंबई

सायबर क्राईमचे बळी होऊ नका! मुंबई सायबर सेलचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कुठल्याही प्रलोभनाला भुलून सायबर क्राईमला (cyber crime) बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांच्या उत्तर मुंबई विभागाच्या (cyber cell Mumbai) सायबर सेलचे उपनिरीक्षक निवृत्ती बावस्कर यांनी केले. नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सायबर गुन्हेगारीविरोधात जनजागृती (Public awareness) करण्यासाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. सुशिक्षित लोकच जास्त सायबर गुन्ह्यांचे बळी होतात, याबाबत त्यांनी माहिती दिली.

सायबर क्राईमपासून बचाव करण्यासाठी कोणती उपाययोजना करावी, तसेच कोणती सुरक्षितता बाळगावी, याची माहितीही बावस्कर यांनी या वेळी दिली. फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच व्हाट्सॲप आदी समाजमाध्यमांचा वापर करताना सुरक्षितता कशी बाळगावी याचे त्यांनी सविस्तर वर्णन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्वरित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

ऑनलाईन व्यवहार करताना...

सायबर गुन्हेगारीचे विविध प्रकार असून त्यासाठी प्रत्येकाने आपली सर्व अकाऊंट कशी सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी आपण स्वतः मुंबै बँकेतील कर्ज घोटाळा कसा उघडकीस आणला याची माहिती उपस्थितांना दिली. त्यामुळे ऑनलाईन कोणतेही व्यवहार करताना विशेष काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT