Mumbai Metro
Mumbai Metro sakal media
मुंबई

मुंबई : मेट्रो स्थानकाच्या नावांत बदल; शिंपोलीचा राजपत्रात उल्लेख

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेच्या (shivsena) दणक्यामुळे बोरिवली पश्चिमेकडील मंडपेश्वर मेट्रो स्थानकाचे (Mandapeshwar metro station) नाव आता मंडपेश्वर-आय सी कॉलनी, तर पहाडी-एक्सर मेट्रो स्थानकाचे नाव शिंपोली स्थानक (Shimpoli railway station) करण्यात येणार आहे. म्हाडा सभापती विनोद घोसाळकर (vinod ghosalkar) यांनी शनिवारी (ता. ५) एमएमआरडीए (MMRDA) आयुक्त एस. श्रीनिवासन यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यानंतर श्रीनिवासन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देशही दिले.

यापूर्वीही विनोद घोसाळकर यांच्यामुळे दहिसर पूर्वेकडील अप्पर दहिसर मेट्रो स्थानकाचे नाव आनंदनगर असे करण्यात आले होते. दहिसर प्रभाग क्रमांक एकच्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी स्थानिक जनतेच्या मागणीनुसार मंडपेश्वर मेट्रो स्थानकाचे नाव मंडपेश्वर आय सी कॉलनी करण्याची मागणी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती; तर पहाडी एक्सर स्थानकाचे नाव बदलून त्याला शिंपोली नाव देण्याची मागणी गावदेवी ग्रामस्थ मंडळाने घोसाळकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता ही नावे बदलली जातील, असे मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले.

शिंपोलीचा राजपत्रात उल्लेख...

दहिसर पूर्व डी एन नगर अंधेरी या मेट्रो मार्गातील स्थानकाला मंडपेश्वर असे नाव देण्यात आले होते. पण या ठिकाणाहून मंडपेश्वर विभाग तीन किलोमीटर दूर असून हा परिसर आय सी कॉलनी म्हणून ओळखला जातो. तसेच शिंपोली या गावाला इतिहास असून भारतीय राजपत्रात त्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानकांना स्थानिक नावे देण्याची मागणी करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT