Traffic
Traffic Sakal media
मुंबई

घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार; खाडीपुलाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा

विरार : बहुचर्चित तसेच लांबणीवर गेलेल्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील (Mumbai-Ahmadabad Highway) नवीन वर्सोवा खाडीपुलाचे काम (varsova creek bridge) सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक समस्या (Traffic issue of ghodbandar) सुटून प्रवास सुसाट होणार आहे. वसई पाली येथील सामाजिक कार्यकर्ते ब्रायन नोरोन्हा यांनी याबाबत २०१६ पासून पाठपुरावा ठेवला होता. कामाची संथ गती पाहता याबाबत त्यांनी महामारीच्या निर्बंधमुक्त काळानंतर पुन्हा सक्रिय पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्याला आता फळ आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHI) भरूच विभागाने संबंधित कंत्राटदाराकडून कामाचा अहवाल मागवून आढावा घेतला. त्यावर सप्टेंबर २०२२ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होण्याची हमी नोरोन्हा यांना प्राधिकरणाने दिली आहे.

२४ डिसेंबर २०१३ रोजी जुना वर्सोवा पुलाला तडे गेल्याने तो सहा महिन्यासाठी बंद ठेवण्यात आला होता. पुढे पुन्हा ऑक्टोबर २०१६ ला पुन्हा पुलाला तडे गेल्याने पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्या वेळी एकदिशा मार्ग सुरू ठेवण्यात आला असल्याने प्रचंड वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जाऊन त्रास सहन करावा लागत होता. मे २०१७ मध्ये चार दिवसांसाठी हा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी ८ डिसेंबर २०१८ ते २०१३ डिसेंबर २०१८ पर्यंत बंद होता.

महाडच्या सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर वर्सोवा पूल चर्चेत आला होता. त्या वेळी नागरिकांनी पत्रव्यवहार करून सरकारचे लक्ष या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न नोरोन्हा यांनी केला होता. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा खाडी पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून या ठिकाणी नव्या उड्डाणपुलाच्या पायाभरणी कामांचा आरंभ ११ जानेवारी २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला होता.

नियमांमुळे कामाला उशीर

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच सीआरझेड, खारफुटी प्रकल्प क्षेत्रात येत असल्याने परवानगीस अडथळा निर्माण झाला असल्याने पुलाच्या कामामध्ये अनेक अडथळे निर्माण झाल्याने प्रकल्प लांबणीवर गेला असल्याचे प्राधिकरणाकडून कळविण्यात आले आहे; मात्र आता हे अडथळे दूर झाल्याने कामास गती प्राप्त झाली आहे. नवीन उड्डाणपुलामुळे वर्सोवा नाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलची आवश्यकता राहणार नसून येथील वाहतूक विनाअडथळा सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे.

वाहतूक कोंडी तसेच धोकादायक झालेला जुना वर्सोवा खाडीपूल हा प्रश्न सुटावा, यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला. प्रकल्प संचालक सूरज कुमार सिंग यांनी लेखी स्वरूपात पुलाचे काम सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे कळविल्याने समाधान वाटत आहे.
- ब्रायन नोरोन्हा, सामाजिक कार्यकर्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT