Aaditya Thackeray Sakal Digital
मुंबई

मुंबईतील प्रत्येक वॉर्डात श्वानासाठी उद्यान : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

वडाळा, ता. ६ (बातमीदार) : बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनी प्रभाग क्रमांक एक हा नेहमीच विधायक कामात अग्रेसर असतो. इथे पेट पार्क, फिश पार्क यांसारख्या नवनवीन संकल्पना दिसून येतात, असे प्रशंसोद्‍गार राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले. बोरिवली पश्चिमेकडील आय. सी. कॉलनी फिश पार्कचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

त्यांनी पेट पार्क या संकल्पनेचे कौतुक केले व मुंबईतील प्रत्येक वॉर्डात श्वानासाठी उद्यान उभारण्यात येईल, असे सांगितले. या वेळी शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, उपमहापौर सुहास वाडकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, महिला संघटक सुजाता शिंगाडे, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, पालिका उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त मृदुला अंडे, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर महिला शाखा संघटक ज्युडीथ मेंडोसा, रिव्हर मार्चचे पदाधिकारी उपस्थित होते.
उद्‍घाटन करण्यात आलेल्या फिश पार्कचे नूतनीकरण करून त्यामध्ये आकर्षक रंगसंगती सादर करत सेल्फी पॉइंट, फिश टॅंक तसेच आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या प्रयत्नाने या फिश पार्कचे नूतनीकरण करण्यात आले आहे. वरळी येथील मत्स्यालय दूर असल्याने बोरिवली-दहिसर परिसरातील नागरिक या फिश पार्कला भेट देत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT