fake notes crime sakal media
मुंबई

नवी मुंबई : नोटा दुपटीच्या बहाण्याने लुबाडले; २० लाख रुपयांच्या बदल्यात बनावट नोटा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : काही मिनिटांत दुप्पट नोटा देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने पुण्यातील व्यावसायिकाला (Businessman) लुबाडल्याचे समोर आले होते. या व्यक्तीला २० लाख रुपयांच्या बदल्यात बनावट नोटा (fake notes) देऊन फसवणूक केली. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी (koparkhairane police) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील मंचर भागात राहणारे सीताराम शिंदे (वय ४४) यांचा शालेय साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे.

त्यांचा भाचा गणेश लांडे मुंबईत राहण्यास असून काही महिन्यांपूर्वी या टोळीने नोटा दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने संपर्क साधला होता. त्याला ३० लाख रुपयांच्या नोटा दिल्यास दुप्पट पैसे मिळतील, असे प्रलोभन दाखवले होते; मात्र गणेशकडे पैसे नसल्याने त्याने आपले मामा शिंदे यांना माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले; मात्र त्यानंतर त्याने वारंवार फोनवरून संपर्क साधून वाशीमध्ये येत खात्री करण्यास सांगितले.

२७ फेब्रुवारीला शिंदे आपल्या मुलासह वाशीमध्ये आल्यानंतर गणेशसोबत आलेल्या व्यक्तीने त्यांना पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात १० हजार रुपये दिले. यानंतर त्यांनी मित्र, नातेवाईक व दागिने गहाण ठेवून २० लाख रुपये जमा केले. मंगळवारी (ता. १) शिंदे पैसे दुप्पट करण्यासाठी नवी मुंबईतील कोपरखैरणेत आले.

गणेश याच्यासह त्यांनी सदर व्यक्तीची वरिष्ठ चौकात भेट घेतली. या ठिकाणी त्या व्यक्तीने कारमध्ये २० लाख रुपयांच्या नोटा मोजल्या आणि त्यानंतर ही रक्कम हिरव्या रंगाच्या बॅगेत ठेवत कुलूप लावून आपल्या सुटकेसमध्ये ठेवली आणि ४० लाख रुपये आणून देण्याचा बहाणा केला; मात्र शिंदे यांनी त्याला रोखले. सदर व्यक्तीने त्यांची रक्कम परत देण्याचा बहाणा करत हिरव्या रंगाची बॅग शिंदे यांना दिली आणि दुप्पट पैसे घेऊन येण्याच्या बहाण्याने पलायन केले; मात्र शिंदे यांना बॅगेबाबत संशय आल्याने त्यांनी कुलूप तोडून बॅगेत तपासणी केली असता बनावट नोटा आढळून आल्या. अखेर त्यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT