मुंबई

२२ वर्षे फरारी असलेला कैदी अटकेत

CD

उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) ः पत्नीला जिवंत जाळल्याप्रकरणी गुजरात बडोदा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल मिळताच गेली २२ वर्षे फरारी असलेल्या कैद्याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
गुजरात सुरतमधील लिंबायत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रमेश उर्फ दिनेश तायडे याने १९९५ साली त्याच्या पत्नीला जिवंत जाळून ठार मारले होते. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो बडोदा कारागृहात शिक्षा भोगत होता.
२२ नोव्हेंबर १९९९ रोजी तायडे याची १५ दिवसांसाठी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. मात्र, १५ दिवस होताच तायडे गुजरातमधून फरार झाला. गुजरात पोलिस सातत्याने त्याचा मागोवा घेण्यासाठी विविध शहरात शोध घेत होते. पण तो २२ वर्षे उलटून गेलेत तरी सापडत नव्हता.
अशात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीची माहिती मिळाली की, फरार असलेला बडोदा कारागृहातील कैदी रमेश उर्फ दिनेश तायडे हा कानसई रोडवरील भरत नगरमध्ये राहत आहे. त्यानुसार आज पहाटे चारच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर महाशब्दे, हवालदार मधुकर माळी, शिपाई नवनाथ कोरडे, अर्जुन मुत्तलगिरी आणि विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे मंगेश वीर यांनी पहाटे भरत नगरात तायडेच्या मुसक्या आवळल्या.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Statement : सांगली जिल्हा बँकेतील बिनविरोध निवडीचा पदवीधर निवडणुकीवर परिणाम? विश्वजीत कदम स्पष्टच म्हणाले!

Manoj Jarange: मोठं षडयंत्र रचलं जातंय, चौकशी करा नाहीतर संशय तुमच्यावर; जरांगेंचा 'ऑडिओ बॉम्ब', शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

90 कोटींचं कर्ज, 55 खटले अन् बँक खात्यात शून्य रुपये; अमिताभ बच्चन यांनी पुन्हा कसं उभं केलं 4000 कोटीचं साम्राज्य?

Mohol Crime News: मोहोळ तालुक्यात पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; पतीविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं काय कारण?

Latest Marathi News Live Update : सौरव दास, आशुतोष रांका आज दिल्ली पोलीस गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत

SCROLL FOR NEXT